भारतीय निवडणूक आयोग

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील ईव्हीएमची बर्न्ट मेमरी/मायक्रोकंट्रोलर तपासणी/पडताळणीसाठी 11 अर्ज झाले प्राप्त

Posted On: 20 JUN 2024 6:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2024

निवडणूक आयोगाने 1 जून 2024 रोजी जारी केलेल्या एसओपीच्या (मानक कार्यप्रणाली) अनुषंगाने, लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 आणि राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, ईव्हीएमची बर्न्ट मेमरी/मायक्रोकंट्रोलर तपासणी/पडताळणीसाठी अनुक्रमे एकूण 8, आणि 3 अर्ज प्राप्त झाले आहेत. तपशील पुढील प्रमाणे:

लोकसभा आम चुनाव 2024

ईवीएम जांच एवं सत्यापन के लिए प्राप्त आवेदनों का सार

क्रम.

सं.

राज्य का नाम

दूसरे या तीसरे स्थान के उम्मीदवार से अनुरोध प्राप्त हुए (पार्टी संबद्धतायदि कोई हो)

संसदीय निर्वाचन क्षेत्र का नाम

विधानसभा क्षेत्र का नाम

जांच और सत्यापन के लिए चयनित मतदान केंद्रों की संख्या

1

आंध्र प्रदेश

वाईएसआरसीपी

विजयनगरम

बोब्बिली

1

नेल्लीमार्ला

1

कुल

2

2

छत्तीसगढ

कांग्रेस

कांकेर

संजारी बालोद

2

गुंदरदेही

1

सिहावा

1

कुल

4

3

हरियाणा

भारतीय राष्ट्रीय कांग्रेस

करनाल

करनाल

2

पानीपत शहर

2

फरीदाबाद

बडकल

2

कुल

6

4

महाराष्ट्र

भारतीय जनता पार्टी

अहमदनगर

शेवगांव

5

राहुरी

5

पार्नेर

10

अहमदनगर शहर

5

श्रीगोंदा

10

 

 

 

 

कर्जत जामखेड

5

कुल

40

5

तमिलनाडु

भारतीय जनता पार्टी

वेल्लोर

वेल्लोर

1

अनाईकट

1

केवी कुप्पम

1

गुडियाथम

1

वानियमबाडी

1

अम्बुर

1

डीएमडीके

विरुधनगर

विरुधनगर

14

 

कुल

20

6

तेलंगाना

भारतीय जनता पार्टी

ज़ाहिराबाद

नारायणखेड़

7

ज़ाहिराबाद

7

एंडोले (एससी)

6

कुल

20


एकूण राज्ये – 6

एकूण संसदीय मतदारसंघ -8

एकूण मतदान केंद्रे – 92

राज्य विधानसभाओं के आम चुनाव 2024

ईवीएम जांच और सत्यापन के लिए प्राप्त आवेदनों का सार

 

क्रम. सं.

राज्य का नाम

दूसरे या तीसरे स्थान के उम्मीदवार से अनुरोध प्राप्त हुए (पार्टी संबद्धतायदि कोई हो)

विधानसभा क्षेत्र का नाम

जांच और सत्यापन के लिए चयनित मतदान केंद्रों की संख्या

1

आंध्र प्रदेश

वाईएसआरसीपी

गजपतिनगरम

1

वाईएसआरसीपी

ओंगोल

12

कुल

13

2

ओडिशा

बीजद

झारसुगुडा

13

कुल राज्य – 2

कुल विधानसभा क्षेत्र - 3

कुल मतदान केंद्र - 26

                   

एकूण राज्ये – 2

एकूण विधानसभा मतदारसंघ -3

एकूण मतदान केंद्रे - 26

भारतीय निवडणूक आयोगाने 1 जून 2024 च्या आपल्या आदेशाद्वारे अर्ज प्रक्रिया,  तपासल्या जाणाऱ्या युनिट्ससाठीचे प्रोटोकॉल, तपासणी/पडताळणी प्रक्रियेसाठी सुरक्षा आणि नियंत्रण आणि आवश्यक कागदपत्रे, याबाबतचे तपशीलवार प्रशासकीय एसओपीच्या जारी केले होते. (SOP link: https://tinyurl.com/yxtxys7u ).

या एसओपी अनुसार, संबंधित राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (सीईओ) उत्पादकांना, आयोगाला सूचित केलेल्या अर्जदारांची एकत्रित यादी, निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत म्हणजेच, 4 जुलै 2024 पर्यंत कळवणे आवश्यक आहे. सीईओंनी यापूर्वीच वेळापत्रकाच्या 15 दिवस आधी उत्पादकांना ही सूचना दिली आहे.

जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार आणि कायदेशीर स्थितीनुसार, सीईओंद्वारे संबंधित उच्च न्यायालयाच्या निबंधकांकडून, वरील प्रमाणे निवडलेल्या, संबंधित मतदारसंघात दाखल केलेल्या निवडणूक याचिकांच्या स्थितीची तपासणी आणि पडताळणी प्रक्रिया 4 आठवड्यांच्या आत सुरू करता येईल.

निवडणूक याचिका (EP) दाखल करण्याची मुदत, सध्याच्या निवडणुकीच्या आवर्तनामध्ये, म्हणजेच निकाल जाहीर झाल्यापासून 45 दिवस इतकी आहे.

ईव्हीएम युनिट्सची बर्न्ट मेमरी/मायक्रोकंट्रोलर तपासण्यासाठी आणि पडताळणीसाठी पद्धती आणि टप्पे ठरवणारी तांत्रिक मानक कार्यप्रणाली आयोगाकडून निवडणूक याचिका कालावधी संपण्यापूर्वी योग्य वेळी जारी केली जाईल.

संबंधित सीईओंकडून ईपी (EP) ची सद्यःस्थिती प्राप्त झाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत उत्पादक ईव्हीएम तपासणी आणि पडताळणीसाठी वेळापत्रक जारी करतील. निवडणूक याचिकेच्या  स्थितीची स्थिती समजल्यावर 4 आठवड्यांच्या आत युनिट्सची तपासणी आणि पडताळणी सुरू होईल.


S.Tupe/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2027145) Visitor Counter : 27