गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी कच्छमधील स्मृतीवनाला प्रतिष्ठित प्रिक्स व्हर्साय म्युझियम्स 2024 च्या जागतिक निवड यादीत स्थान मिळणे हा गौरवशाली क्षण असल्याचे सांगत व्यक्त केला आनंद


2001 मधील भीषण भूकंपात आपण गमावलेल्या लोकांच्या आठवणी जतन करणारे स्मृतीवन हे एक संग्रहालय आहे, ज्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मांडली होती – अमित शाह

प्रिक्स व्हर्साय म्युझियम्स 2024 च्या जागतिक निवडीमध्ये त्याचा समावेश झाल्यामुळे त्यांच्या आठवणींचा सुगंध जगभरात पसरेल

Posted On: 15 JUN 2024 8:34PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी, कच्छमधील स्मृतीवनला प्रतिष्ठित प्रिक्स व्हर्साय म्युझियम्स 2024 च्या जागतिक निवड यादीत स्थान मिळणे, हा गौरवशाली क्षण असल्याचे म्हटले आहे.

X प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले, “कच्छमधील स्मृतीवनला प्रतिष्ठित प्रिक्स व्हर्साय म्युझियम्स 2024 च्या जागतिक निवड यादीत स्थान मिळणे, हा आपल्या सर्वांसाठी एक हृदयस्पर्शी क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कल्पनेतून साकार झालेले स्मृतीवन हे 2001 मधील भीषण भूकंपात आपण गमावलेल्या लोकांच्या आठवणी जतन करणारे संग्रहालय आहे. प्रिक्स व्हर्साय म्युझियम 2024 च्या जागतिक निवडीमध्ये त्याचा समावेश झाल्यामुळे त्यांच्या आठवणींचा सुगंध जगभरात पसरेल.

***

M.Pange/S.Kane/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025630) Visitor Counter : 35