गृह मंत्रालय
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली येथील नॉर्थ ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2024 7:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली येथील नॉर्थ ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृह मंत्रालय राष्ट्राच्या आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमीप्रमाणेच वचनबद्ध राहील, असे अमित शाह यांनी एक्स वर म्हटले आहे. मोदी 3.0 या कार्यकाळात केंद्रीय गृह मंत्रालय देशाच्या सुरक्षेला अत्युच्च प्राधान्य देईल आणि भारताला दहशतवाद, घुसखोरी आणि नक्षलवादाच्या विरोधात ताकदीने उभे राहण्यासाठी झटेल ,असे त्यांनी म्हटले आहे.

त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे जाऊन शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली. देशाच्या सन्मानाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या पोलीस दलातील हुतात्म्यांचे स्मरण आणि त्यांच्या बलिदानाची गाथा देशप्रेमाची जाणीव सदैव जागृत ठेवेल, असे ते म्हणाले.


S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2024366)
आगंतुक पटल : 115
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Khasi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam