श्रम आणि रोजगार मंत्रालय
कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे महासंचालक म्हणून कमल किशोर सोन यांनी स्वीकारला पदभार
Posted On:
07 JUN 2024 4:18PM by PIB Mumbai
झारखंड केडरचे वरिष्ठ प्रशासकीय सेवेतील अधिकारी (तुकडी: 1998) कमल किशोर सोन यांनी 31.05.2024 रोजी ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे महासंचालक म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारला. ईएसआयसी हा श्रम आणि रोजगार मंत्रालयांतर्गत कार्यरत विभाग असून सोन हे सध्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या कामगार कल्याण विभागात अतिरिक्त सचिव आणि महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांना झारखंड राज्यातील जमीन महसूल व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन, कृषी आणि सहकार, आरोग्य, इमारत बांधकाम, वाहतूक, वित्त, ऊर्जा, जलसंपदा, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण इ. विविध विभागांच्या कारभाराचा आणि व्यवस्थापनाचा गाढा अनुभव आहे.
***
N.Chitale/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2023513)
Visitor Counter : 85