पंतप्रधान कार्यालय
श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन
श्रीलंकेशी दृढ संबंध जोपासण्याच्या सातत्यपूर्ण कटिबद्धतेचा पंतप्रधान मोदी यांच्याकडून पुनरुच्चार
संकल्पना दस्तावेज प्रत्यक्षात साकार करण्यासाठी दोन्ही नेते उत्सुक
Posted On:
05 JUN 2024 10:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2024
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे यांच्या स्नेहपूर्ण सदिच्छांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले. शेजारी देशास प्राधान्य हे भारताचे धोरण तसेच सागर संकल्पना यांचे अनुसरण करण्यात भारत आणि श्रीलंका यांच्यातील अधिक दृढ संबंधांची जोपासना करण्याप्रती भारत सतत वचनबद्ध राहील अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे यांच्या जुलै 2023 मधील भारतभेटी दरम्यान जारी करण्यात आलेल्या संकल्पना दस्तावेजातील बाबी लागू करण्यासंदर्भात लक्षणीय प्रगती झाली आहे याची देखील या दोन्ही नेत्यांनी यावेळी नोंद घेतली. विशेष करून दोन्ही नेत्यांनी परस्पर वृद्धी, विकास तसेच समृद्धी यांना चालना देण्यासाठी सर्व पद्धतींच्या संपर्कात सुधारणा करण्याच्या बाबतीत प्रगतीला वेग देण्याप्रती दोन्ही नेत्यांनी त्यांच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.
* * *
NM/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2023092)
Visitor Counter : 67
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam