जलशक्ती मंत्रालय
जलशक्ती मंत्रालयाने जनसंवाद प्रशिक्षण कार्यक्रमाची केली घोषणा
Posted On:
31 MAY 2024 1:07PM by PIB Mumbai
जलशक्ती मंत्रालयाच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने ( डीओडब्लूआर, आरडी,जीआर)
मास कम्युनिकेशन इंटर्नशिप म्हणजेच जनसंवाद प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थांमध्ये जन संवादामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा संशोधन अभ्यासक्रमात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी संलग्न करणे हा आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रम निवडलेल्या उमेदवारांना विभागाच्या मीडिया/सोशल मीडिया संबंधित कार्याशी संलग्न होण्याची अल्पकालीन संधी प्रदान करतो. जन संवाद किंवा पत्रकारिता किंवा संबंधित क्षेत्रांमध्ये पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी किंवा वरील क्षेत्रांमध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालय /विद्यापीठातून पदव्युत्तर किंवा डिप्लोमा करत असलेले विद्यार्थी (जन संवाद किंवा संबंधित क्षेत्रात पदवी पूर्ण केल्यानंतर) मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेल्या अटीं आणि शर्तींच्या अधीन राहून पात्र असतील.
प्रशिक्षणाचा कालावधी सहा ते नऊ महिने असेल. निवडलेल्या उमेदवारांना यशस्वीरित्या प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्यावर 15000 रुपये प्रति महिना मानधन आणि व्यावसायिक प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाईल. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जून, 2024 आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्यांनी फक्त ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करावा, हा अर्ज https://mowr.nic.in/internship/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इतर तपशीलांसाठी, https://jalshakti-dowr.gov.in/ येथे जावे .
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2022302)
Visitor Counter : 128