गृह मंत्रालय

इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष डॉ.सय्यद इब्राहिम रईसी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर-अब्दोल्लाहिया यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन


भारतात मंगळवारी 21 मे 2024 रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Posted On: 20 MAY 2024 6:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मे 2024

इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष महामहिम डॉ. सय्यद इब्राहिम रईसी,आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्री महामहिम हुसेन अमीर-अब्दोल्लाहियायांचे एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. श्रद्धांजली म्हणून, भारत सरकारने 21 मे 2024 (मंगळवार) रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

या शोकदिनी, राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकत असलेल्या सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील आणि या  दिवशी मनोरंजनात्मक कोणतेही शासकीय कार्यक्रम होणार नाहीत.

N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2021135) Visitor Counter : 76