भारतीय निवडणूक आयोग
श्रीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये रात्री 8 वाजताच्या आकडेवारीनुसार 36.58% मतदान, गेल्या अनेक दशकांमधील मतदानाचे हे सर्वोच्च प्रमाण
बडगाम, गंदरबल, पुलवामा आणि शोपियान या भागांमध्ये देखील संपूर्णत: शांततापूर्ण आणि सर्वोच्च प्रमाणातील मतदान
Posted On:
13 MAY 2024 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2024
अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील चौथ्या टप्प्यामध्ये आज जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात आज अत्यंत शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. श्रीनगर, गंदरबल, पुलवामा आणि बडगाम या जिल्ह्यांमध्ये तसेच शोपियान जिल्ह्याच्या काही भागात रात्री 8 वाजताच्या आकडेवारीनुसार 36.58% मतदान झाले.
श्रीनगर, बडगाम, गंडेरबाल, पुलवामा आणि शोपिअन इथल्या मतदारांनी विक्रमी संख्येने मतदानासाठी केलेल्या गर्दीतून निवडणूक प्रक्रियेवरील त्यांची श्रद्धा आणि मतदानाचा उत्साह दिसून आला. कलम 370 हटवून जम्मू आणि कश्मिर पुनर्रचना कायदा, 2019 लागू केल्यानंतर काश्मिर खोऱ्यात झालेली ही पहिली लोकसभा निवडणूक होती.
Gross Voter turnout in past few elections
Year
|
2019
|
2014
|
2009
|
2004
|
1999
|
1998
|
1996
|
Srinagar PC
|
14.43%
|
25.86%
|
25.55%
|
18.57%
|
11.93%
|
30.06%
|
40.94%
|
Migrant voters voting at special polling stations
स्वीप उपक्रमांचा भाग म्हणून मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी नियोजित, सातत्यपूर्ण आणि लक्ष्यित हस्तक्षेप केल्याचा परिणाम मतदारांची संख्या लक्षणीयरित्या वाढण्यात दिसून आला.
N.Chitale/S.Chitnis/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2020493)
Visitor Counter : 96