संरक्षण मंत्रालय
भारतीय तटरक्षक दलाने जहाज बांधणीसाठी स्वदेशी सागरी दर्जाच्या ॲल्युमिनियमचे उत्पादन आणि पुरवठ्यासाठी खासगी क्षेत्राबरोबर केला सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
10 MAY 2024 12:17PM by PIB Mumbai
भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) आणि हिंडाल्को इंडस्ट्रीज यांनी 10 मे 2024 रोजी, नवी दिल्ली येथे भारतीय सार्वजनिक आणि खासगी जहाज बांधणी कंपन्यांना जहाजांच्या बांधकामासाठी सागरी दर्जाच्या स्वदेशी ॲल्युमिनियमचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारा अंतर्गत त्रैमासिक मूल्य आकारणी, पुरवठ्यासाठी प्राधान्य आणि एकूण उलाढालीवरील सवलत यांसारखे लाभही मिळतील.
भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये सध्या उथळ पाण्यात काम करण्यासाठी सक्षम ॲल्युमिनियम हुल असलेली 67 जहाजे आहेत. किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी, भारतीय तटरक्षक दलाने आपल्या ताफ्यामध्ये स्वदेशी बनावटीच्या सागरी दर्जाच्या ॲल्युमिनियमचा वापर करता येईल, अशी आणखी जहाजे समाविष्ट करण्याची योजना आखली आहे.
भारतीय तटरक्षक दलाचे उपमहासंचालक (सामग्री आणि देखभाल), महानिरीक्षक एच के शर्मा आणि हिंडाल्को डाउनस्ट्रीम ॲल्युमिनियम बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश कौल यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
VUSS.jpeg)
1J8X.jpeg)
***
S.Kakade/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2020208)
आगंतुक पटल : 156