ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय

ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाने नवी दिल्लीत विज्ञान भवनात केले आंतरराष्ट्रीय योग दिवस-2024 च्या उलटगणना कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 09 MAY 2024 2:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मे 2024

आगामी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाने नवी दिल्लीत विज्ञान भवनाच्या संकुलात एका उलटगणना कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमामध्ये ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाचे सचिव अधिकारी/ कर्मचारी आणि विज्ञान भवनाच्या संकुलात तैनात असलेले सीआयएसएफ चे अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे  योग प्रशिक्षक आणि योग सादरकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय सहभाग घेतला आणि  भारतीय संस्कृतीमध्ये खोलवर रुजलेल्या योगसाधनेचा  कालातीत लाभ  अधोरेखित केला.

समग्र निरामयतेची जोपासना करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमात विविध योग प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाच्या सचिवांनी भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याला चालना देण्यामध्ये योगसाधनेच्या महत्त्वावर भर दिला.

योगसाधनेच्या माध्यमातून आरोग्य आणि निरामयतेच्या संस्कृतीची जोपासना करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुष्टी करण्याच्या उद्देशाने ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाने या परिवर्तनकारी दिवसाच्या उलटगणना कार्यक्रमाचे आयोजन केले. योगसाधनेच्या सार्वत्रिक आवाहनाचे स्मरण करून देणारा आणि समकालीन आव्हानांचे निराकरण करण्यामध्ये याचे महत्त्व दर्शवणारा हा कार्यक्रम होता.

भारताच्या प्राचीन परंपरेत रुजलेली योगसाधना भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावरील सकारात्मक प्रभावासाठी ओळखली जाते. ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाच्या या कार्यक्रमाने अधिक निरोगी आणि अधिक संतुलित जीवनशैलीसाठी दैनंदिन जीवनात अंगिकार करण्यासाठी योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित केले.   

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2020069) Visitor Counter : 51