ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आरईसीला गुजरातमधल्या  गिफ्ट सिटीमध्ये उपशाखा उघडण्यास रिझर्व बँकेची मंजुरी

Posted On: 05 MAY 2024 5:45PM by PIB Mumbai

 

ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आणि आघाडीची बिगर बँकिंग वित्तीय कंपनी असलेल्या आरईसी लिमिटेड ला गुजरातमधील गांधीनगर येथील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट”) मध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात (आयएफएससी) स्वतःच्या मालकीची उपशाखा उघडण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' (दि. 3 मे 2024) प्राप्त झाले आहे.

भारतातील वित्तीय सेवांसाठी वाढणाऱ्या केंद्रात, गिफ्ट सिटीत कार्य विस्तारण्याचा निर्णय हा आरईसी ने त्याच्या कार्यविभागात वैविध्य आणण्यासाठी आणि वाढीकरिता नवीन मार्गांचा धांडोळा घेण्यासाठी आहे. प्रस्तावित उपकंपनी गिफ्ट अंतर्गत वित्त कंपनी म्हणून कर्ज देणे, गुंतवणूक आणि इतर वित्तीय सेवांसह अनेक आर्थिक उपक्रमांमध्ये सहभागी असेल.

विकासावर बोलताना, आरईसी लिमिटेड चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विवेक कुमार देवांगन म्हणाले: गिफ्ट सिटी प्लॅटफॉर्म जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह आंतरराष्ट्रीय कर्ज उपक्रमांसाठी पोषक  वातावरण प्रदान करतो. आम्हाला खात्री आहे की आरईसी याचा उपयोग जागतिक बाजारपेठेत स्वतःचे स्थान निर्माण करण्याकरिता करेल. गिफ्ट सिटी मधील कंपनी आरईसी साठी केवळ नवीन व्यवसाय संधीच देणार नाही तर देशाच्या उर्जा क्षेत्राच्या वाढीसाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान देईल. जागतिक स्तरावर आमचा ठसा वाढवताना भारताच्या उर्जा आणि पायाभूत क्षेत्रातील वाढीला चालना देण्याच्या आरईसी च्या मिशनला पुढे नेण्यासाठी आम्ही या धोरणात्मक निर्णयाचा लाभ घेण्यास उत्सुक आहोत.

***

N.Chitale/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2019682) Visitor Counter : 94