भारतीय निवडणूक आयोग

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात 66.14% तर दुसऱ्या टप्प्यात 66.71% मतदान


केंद्रीय निवडणूक आयोगाने टप्पा 1 आणि टप्पा 2 साठी मतदानाचा डेटा केला प्रकाशित

Posted On: 30 APR 2024 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2024

 

सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये, आतापर्यंतच्या दोन टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यात 102 लोकसभा मतदारसंघात 66.14% तर दुसऱ्या टप्प्यात 88 लोकसभा मतदारसंघात 66.71% मतदान झाले आहे. या दोन टप्प्यातील लिंगनिहाय मतदानाची आकडेवारी खाली दिली आहे:

Phase

Male Turnout

Female turnout

Third gender turnout

Overall turnout

Phase 1

66.22%

66.07%

31.32%

66.14%

Phase 2

66.99%

66.42%

23.86%

66.71%

 

पहिल्या टप्प्यातील राज्यनिहाय आणि लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाचा डेटा तक्ता क्रमांक 1 आणि 2 मध्ये तर दुसऱ्या टप्प्यातील डेटा अनुक्रमे तक्ता 3 आणि 4 मध्ये दिलेला आहे.  रिक्त रकाना हे  सूचित करतो की त्या श्रेणीत कोणतेही नोंदणीकृत मतदार नाहीत.  फॉर्म 17C द्वारे निवडणूक निर्णय अधिका-यांनी माहिती तंत्रज्ञान प्रणालीमध्ये अपडेट केल्याप्रमाणे व्होटर टर्न आऊट  ॲपवर लोकसभा मतदारसंघनिहाय आणि विधानसभा मतदारसंघनिहाय डेटा देखील नियमितपणे अपडेट केला जातो. मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रासाठी फॉर्म 17C ची प्रत सर्व उमेदवारांना त्यांच्या मतदान प्रतिनिधीमार्फत प्रदान केली जाते.   मतदानाची अंतिम आकडेवारी केवळ टपालाद्वारे  प्राप्त मतपत्रिकांच्या मोजणीनंतर आणि एकूण मतांच्या संख्येत त्याची भर घालून केलेल्या मतमोजणीनंतर उपलब्ध करून दिली जाईल. टपालाद्वारे  प्राप्त मतपत्रिकांमध्ये सेवा मतदारांना दिलेल्या टपाली मतपत्रिका, अनुपस्थित मतदार (85 वर्षांवरील वृद्ध, दिव्यांग, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी इ.) आणि निवडणूक कर्तव्यावरील मतदार यांचा समावेश होतो. वैधानिक तरतुदींनुसार प्राप्त झालेल्या अशा टपाली  मतपत्रिकांचा दैनिक हिशोब सर्व उमेदवारांना दिला जातो.

याशिवाय, प्रसारमाध्यमांसह विविध भागधारकांच्या संदर्भासाठी, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांचा राज्य आणि लोकसभा मतदारसंघनिहाय एकूण मतदानाचा डेटादेखील अनुक्रमे तक्ता 5 आणि 6 मध्ये मांडण्यात आला आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून टप्पा 1 आणि टप्पा 2 साठी मतदानाचा प्रकाशित डेटा पाहण्‍यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2019234) Visitor Counter : 113