भारतीय निवडणूक आयोग

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1351 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात


2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 95 लोकसभा मतदारसंघांतून 2963 उमेदवारी अर्ज दाखल

Posted On: 23 APR 2024 7:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2024

 

लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1351 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये मध्यप्रदेशातील निवडणूक स्थगित करण्यात आलेल्या 29-बैतुल  (एसटी) या मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या 8 उमेदवारांचा देखील समावेश आहे. तसेच गुजरातमधील सुरत मतदार संघातून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. या सर्व 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये उमेदवारी मागे घेण्यासाठी 22 एप्रिल 2024 पर्यंतची मुदत होती.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी या 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 95 लोकसभा मतदारसंघांतून (29-बेतुलसह) एकूण 2963 उमेदवारी अर्ज भरण्यात आले.या सर्व 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत 19 एप्रिल 2024 रोजी संपली. दाखल झालेल्या  सर्व अर्जांच्या छाननीनंतर 1563 अर्ज वैध ठरले. 

तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी गुजरातमधील 26 लोकसभा मतदारसंघांतून सर्वाधिक 658 उमेदवारी अर्ज सादर झाले. त्याखालोखाल महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघांतून 519 उमेदवारी अर्ज सादर झाले. महाराष्ट्रामध्ये 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राज्यातील सर्वाधिक 77 उमेदवारी अर्ज दाखल  झाले तर त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 5-विलासपूर लोकसभा मतदारसंघात 68 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणूकीचा राज्य/केंद्रशासित प्रदेश निहाय तपशील:

State/UT

Number of PCs in third phase

Nomination forms received

Valid candidates after scrutiny

After withdrawal, final Contesting

Candidates

Assam

4

126

52

47

Bihar

5

141

54

54

Chhattisgarh

7

319

187

168

Dadra & Nagar Haveli and

 

Daman and Diu

2

28

13

12

Goa

2

33

16

16

Gujarat

26

658

328

266

Jammu & Kashmir

1

28

21

20

Karnataka

14

503

272

227

Madhya Pradesh

9

236

140

127

Maharashtra

11

519

317

258

Uttar Pradesh

10

271

104

100

West Bengal

4

101

59

57

Total

95

2963

1563

1352

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018644) Visitor Counter : 77