गृह मंत्रालय

राष्ट्रपती भवनात आयोजित नागरी पुरस्कार सोहळा - I मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते वर्ष 2024 साठी 3 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार प्रदान

Posted On: 22 APR 2024 10:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2024

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित वर्ष  2024 च्या नागरी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात 3 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार  प्रदान केले..

यावेळी उपराष्ट्रपती  जगदीप धनखड, पंतप्रधान  नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, अनेक केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्र्यांनी नवी दिल्लीतील गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित  भोजन समारंभात पद्म पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला.

पद्म पुरस्कार विजेते उद्या सकाळी (23 एप्रिल 2024) राष्ट्रीय युद्ध स्मारक इथे आदरांजली वाहतील. तसेच राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान संग्रहालयालाही ते भेट देतील.

 

* * *

S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018541) Visitor Counter : 56