कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (डी ए आर पी जी) आणि कंबोडियाचे नागरी सेवा मंत्रालय, यांच्यात नागरी सेवेतील मनुष्यबळ विकास क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी

प्रविष्टि तिथि: 22 APR 2024 8:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2024

 

कार्मिक, सार्वजनिक प्रशासन आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (डी ए आर पी जी) आणि कंबोडियाचे  नागरी सेवा मंत्रालय, यांच्यात आज नागरी सेवेतील मनुष्यबळ विकास क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. या सामंजस्य करारामुळे भारत आणि कंबोडिया यांच्यात येत्या 5 वर्षांमध्ये नागरी सेवेतील मनुष्यबळ विकासाच्या क्षेत्रात परस्पर आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील. 

हा सामंजस्य करार नागरी सेवेतील मनुष्यबळ  विकासाच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय देवाणघेवाण आणि सहकार्य मजबूत करण्यावर आणि प्रोत्साहन देण्यावर भर देईल तसेच भारताच्या कार्मिक प्रशासन संस्था आणि कंबोडियाच्या नागरी सेवा मंत्रालयाच्या संस्था यांच्यात  संवाद साधण्यास मदत करेल, असे डीएआरपीजीचे सचिव व्ही. श्रीनिवास यांनी यावेळी सांगितले.

प्रशासकीय सुधारणांवर भर देणाऱ्या आदान प्रदान भेटीगाठी, सुशासन वेबिनार, संशोधन प्रकाशन, संस्थात्मक देवाणघेवाण, क्षमता उभारणी कार्यक्रम आणि सुशासन पद्धतींच्या प्रतिकृती या उपक्रमांमधून हे साध्य करता येईल. वर्ष 2023-24 मध्ये, 156 कंबोडियन नागरी सेवकांनी नॅशनल सेंटर ऑफ गुड गव्हर्नन्स येथे 4 क्षमता निर्माण कार्यक्रमांना हजेरी लावली. तर वर्ष 2024-25 साठी, 240 कंबोडियन नागरी सेवकांसाठी 6 क्षमता निर्माण कार्यक्रम आयोजित केले आहेत. या सामंजस्य करारात अंतर्भूत असलेल्या सर्व तरतुदींची वेळेत पूर्तता करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.

 

* * *

S.Kane/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2018523) आगंतुक पटल : 139
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Tamil