संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी खंबातच्या आखातातील मासेमारी बोटीतून गंभीर जखमी कर्मचाऱ्याला बाहेर काढले

Posted On: 04 APR 2024 7:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2024

भारतीय तटरक्षक दलाच्या पिपावाव येथील केंद्रात तैनात जवानांनी काल 03 एप्रिल 2024 रोजी  खंबातच्या आखातात, किनाऱ्यापासून 50 किमी अंतरावर असलेल्या पुष्कर राज या मासेमारी बोटीतून गंभीर जखमी झालेल्या 37 वर्षीय रुग्णाला बाहेर काढले. यासंदर्भातील माहिती मिळताच, पिपावाव येथील सागरी बचाव उपकेंद्राने आयसीजी इंटरसेप्टर बोट सी-409 ही तैनातीवर असलेली बोट मासेमारी बोटीकडे वळवली.

घटनास्थळी पोहोचल्यावर, इंटरसेप्टर बोटीतील कर्मचाऱ्यांनी आयएफबीशी संपर्क प्रस्थापित केला आणि सदर मच्छिमाराच्या डाव्या पायाचे हाड तुटले असून घोटा विलग झाला असल्याची माहिती देण्यात आली. इंटरसेप्टर बोटीतील कर्मचाऱ्यांनी रुग्णाला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि आयसीजीच्या वैद्यकीय पथकाने त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरु केले. स्थिर स्थितीत असलेल्या सदर रुग्णाला पुढील वैद्यकीय व्यवस्थापनासाठी नंतर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.


N.Meshram/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2017195) Visitor Counter : 123