राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
प्रविष्टि तिथि:
30 MAR 2024 1:14PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (30 मार्च 2024) राष्ट्रपती भवन येथे आयोजित समारंभात भारतरत्न पुरस्कार प्रदान केले. पुढील मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न बहाल करण्यात आले:
पी.व्ही. नरसिंह राव मरणोत्तर. दिवंगत पी. व्ही. नरसिंह राव यांच्या वतीने त्यांचे पुत्र पी. व्ही. प्रभाकर राव यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग मरणोत्तर. स्वर्गीय चौधरी चरणसिंग यांच्या वतीने भारतरत्न हा पुरस्कार त्यांचे नातू जयंत चौधरी यांनी स्वीकारला.
डॉ. एम.एस. स्वामिनाथन मरणोत्तर. दिवंगत डॉ.एम.एस.स्वामिनाथन यांच्या वतीने त्यांच्या कन्या डॉ. नित्या राव यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.
कर्पूरी ठाकूर मरणोत्तर. दिवंगत कर्पूरी ठाकूर यांच्या वतीने, त्यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.





***
M.Iyengar/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2016704)
आगंतुक पटल : 272