रेल्वे मंत्रालय
होळी सणाच्या कालावधीत प्रवाशांसाठी सुलभ आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून 540 गाड्या अधिसूचित
प्रमुख स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनाला प्राधान्य
देशभरातल्या रेल्वेमार्गांवरची महत्त्वाची स्थानके जोडण्याच्या दृष्टीने या गाड्यांचे नियोजन
गेल्या वर्षीच्या तुलनेत या सणासाठी यंदा 219 अधिक गाड्यांची सेवा
Posted On:
21 MAR 2024 2:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 मार्च 2024
सध्या सुरू असलेल्या होळी सणाच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून 540 रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत.
देशभरातल्या रेल्वेमार्गांवरची महत्त्वाची स्थानके जोडण्याच्या दृष्टीने या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जसे की, दिल्ली-पाटणा, दिल्ली-भागलपूर, दिल्ली-मुझफ्फरपूर, दिल्ली-सहरसा, गोरखपूर-मुंबई, कोलकाता-पुरी, गुवाहाटी-रांची, नवी दिल्ली-श्री माता वैष्णो देवी कटरा, जयपूर- वांद्रे टर्मिनस, पुणे- दानापूर, दुर्ग-पाटणा, बरौनी-सुरत इ. यांसारख्या रेल्वे मार्गांवर देशभरातील प्रमुख स्थळांना जोडण्यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
क्र
|
रेल्वे
|
अधिसूचित सेवा
|
1
|
मध्य रेल्वे
|
88
|
2
|
पूर्व मध्य रेल्वे
|
79
|
3
|
पूर्व रेल्वे
|
17
|
4
|
पूर्व तटीय रेल्वे
|
12
|
5
|
उत्तर मध्य रेल्वे
|
16
|
6
|
उत्तर पूर्व रेल्वे
|
39
|
7
|
उत्तर पूर्व सीमा रेल्वे
|
14
|
8
|
उत्तर रेल्वे
|
93
|
9
|
उत्तर पश्चिम रेल्वे
|
25
|
10
|
दक्षिण मध्य रेल्वे
|
19
|
11
|
दक्षिण पूर्व रेल्वे
|
34
|
12
|
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
|
4
|
13
|
दक्षिण रेल्वे
|
19
|
14
|
दक्षिण पश्चिम रेल्वे
|
6
|
15
|
पश्चिम मध्य रेल्वे
|
13
|
16
|
पश्चिम रेल्वे
|
62
|
|
एकूण
|
540
|
अनारक्षित डब्यांमध्ये प्रवाशांच्या सुव्यवस्थित प्रवेशासाठी रेल्वे संरक्षण दल (RPF) कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली टर्मिनस स्थानकांवर रांगा लावून गर्दी नियंत्रित करण्याचे उपाय सुनिश्चित केले जात आहेत.
प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त आरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. गाड्या सुरळीत चालाव्यात यासाठी प्रमुख स्थानकांवर आपत्कालीन कर्तव्यावर अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे सेवेत जर कोणता व्यत्यय आलाच तर तो त्वरेने दूर करण्यासाठी विविध विभागांमध्ये कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
फलाटांवरील गाड्यांचे आगमन/निर्गमन याविषयी सातत्याने आणि वेळेवर घोषणा व्हावी, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
PK/Sonali K/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015896)
Visitor Counter : 143