इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
देशव्यापी डिजिटल समावेशनासाठी, उद्या युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स म्हणजेच यूए दिनी, एनआयएक्सआय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ‘भाषा नेट’ पोर्टलचा करणार शुभारंभ
Posted On:
20 MAR 2024 5:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 20 मार्च 2024
उद्या म्हणजेच 21 मार्च 2024 रोजी, नवी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात, नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया (NIXI), युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स डे च्या निमित्ताने ‘भाषा नेट’ या पोर्टलचा शुभारंभ करणार आहे. निक्सी आणि इलेक्ट्रॉनिक्स-माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे संयुक्त विद्यमाने आयोजित या दुसऱ्या कार्यक्रमातून देशभरात यूए आणि डिजिटल समावेशनाला प्रोत्साहन देण्याची कटिबद्धताच व्यक्त होत आहे. त्याशिवाय, इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाईनिंग नेम्स अँड नंबर्स (ICANN) आणि इलेक्ट्रॉनिक्स-माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा इंटरनेट गव्हर्नन्स विभाग देखील यूडे दिनाला सक्रिय समर्थन देत आहे.
यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना, “भाषा नेट: युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स वर भर” अशी असून त्याद्वारे, डिजिटल विश्वात कोणीही व्यक्ती- मग त्यांची भाषा, लिपी कुठलीही असली – तरीही सहभागी होऊ शकतील यासाठी निक्सी करत असलेले प्रयत्नच अधोरेखित होत आहेत.
यूए डेच्या माध्यमातून, संबंधित भागधारकांना एकत्रित करणे आणि आजच्या डिजिटल परिदृश्यात, सार्वत्रिक स्वीकारार्हतेसाठी सज्ज असण्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवणे हे निक्सी आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित वक्त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्य भाषणे, चर्चासत्रे आणि तांत्रिक कार्यशाळांसह आकर्षक सत्रे असतील. ही चर्चा यूए चे महत्त्व आणि व्यापक स्वीकृती प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या पावलांवर लक्ष केंद्रित करेल.
कार्यक्रम आणि सहभागाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकला भेट द्याः https://uaday.in/
निक्सी बद्दलः
19 जून 2003 रोजी स्थापन झालेली नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया ही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक ना-नफा (कलम 8) तत्वावर चालणारी कंपनी आही. इंटरनेट व्यवस्था निर्माण करण्यासाठी तसच ती सर्वसामान्य लोकांना वापरता येईल इतकी सक्षम आणि सुलभ करण्यासाठी विविध पायाभूत सुविधा उपलब्ध भारतात इंटरनेटचे जाळे आणि त्याचा वापर वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. निक्सी अंतर्गत येणाऱ्या चार सेवांमध्ये आयएक्सपी स्थापन करणे, इंटरनेट एक्सचेंज पॉईंट्स तयार करणे, डॉट इन डोमेन डिजिटल आयडेंटिटी तयार करण्यासाठी डॉट ईन नोंदणी, आयपीव्ही 4 आणि आयपीव्ही 6 अॅड्रेस द्वारे आयआरआयएनएन आणि डेटा स्टोरेज सेवांसाठी एनआयएक्सआय-सीएससी अंतर्गत डेटा सेंटर सेवा, अशा जबाबदाऱ्यांचा समावेश आहे.
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015722)
Visitor Counter : 99