दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टपाल विभागात काम करणाऱ्या अडीच लाख ग्रामीण टपाल सेवकांसाठी आर्थिक सुधारणा योजनेचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले अनावरण
Posted On:
15 MAR 2024 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2024
केंद्रीय दूरसंचार, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज टपाल विभागात कार्यरत असलेल्या अडीच लाखांहून अधिक ग्रामीण टपाल सेवकांच्या सेवेतील साचलेपण दूर करण्यासाठी आणि सेवेची परिस्थिती सुधारण्यासाठी आर्थिक सुधारणा योजनेचे अनावरण केले. ग्रामीण टपाल सेवक ग्रामीण भागातील टपाल विभागाचा कणा म्हणून काम करतात आणि आपल्या देशाच्या दुर्गम भागात टपाल आणि वित्तीय सेवा पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
ग्रामीण टपाल सेवांची प्रमुख वैशिष्ट्ये (ग्रँट ऑफ फायनान्शियल अपग्रेडेशन) योजना, 2024.
- प्रत्येक ग्रामीण टपाल सेवकाला 12, 24 आणि 36 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर अनुक्रमे वार्षिक 4,320/ -, 5,520/ - आणि 7,200/- रुपये अशा तीन आर्थिक सुधारणा दिल्या जातील.
- हे ग्रामीण टपाल सेवकांना 'वेळेशी संबंधित नियमित भत्ता (टीआरसीए)' या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या मोबदल्याखेरीज आहे.
- ग्रामीण टपाल सेवकांच्या सेवा सुधारण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे 256 लाखांहून अधिक टपाल सेवकांना फायदा होईल आणि त्यांच्या सेवेतील गतिहीनता दूर होईल अशी अपेक्षा आहे.

* * *
S.Kane/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2015014)