सांस्कृतिक मंत्रालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या 94 नामवंत कलाकारांना 2022 आणि 2023 या वर्षांसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार (अकादमी पुरस्कार) प्रदान करणार
Posted On:
05 MAR 2024 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2022 आणि 2023 या वर्षांसाठी संगीत, नृत्य, नाटक, लोकगीत आणि आदिवासी कला, कठपुतळी आणि संबंधित नाट्य कला प्रकारात अभिव्यक्त झालेल्या ललित कला क्षेत्रातील 94 नामवंत कलाकारांना (दोन संयुक्त पुरस्कार) संगीत नाटक अकादमी पुरस्कार (अकादमी पुरस्कार) प्रदान करतील. सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विभागाचे मंत्री जी. किशन रेड्डी; विधी आणि न्याय (स्वतंत्र प्रभार) आणि संसदीय कामकाज आणि संस्कृती राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल; सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन आणि संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा या पुरस्कार वितरण सोहोळ्याला उपस्थित राहणार आहेत.
वर्ष 2022 आणि 2023 च्या अकादमी पुरस्कारांव्यतिरिक्त, राष्ट्रपती 7 नामवंत कलाकारांना संगीत नाटक अकादमी अधिछात्रवृत्ति (अकादमी रत्न) देखील प्रदान करतील (एक संयुक्त फेलोशिप). संगीत नाटक अकादमी अधिछात्रवृत्ति (अकादमी रत्न) हा कला क्षेत्रातील नामवंत कलाकारांना त्याच्या/तिच्या कला प्रकारातील अपवादात्मक योगदानाबद्दल दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. अकादमीची फेलोशिप हा सर्वात प्रतिष्ठित आणि दुर्मिळ सन्मान आहे, जो नेहमी जास्तीत जास्त 40 जणांनाच देता येतो.
अकादमी पुरस्कार 1952 पासून प्रदान केले जात आहेत. हे सन्मान केवळ उत्कृष्टता आणि कर्तृत्वाच्या सर्वोच्च दर्जाचेच प्रतीक नाहीत, तर सातत्यपूर्ण वैयक्तिक कार्य आणि योगदान देखील जोखतात. अकादमी फेलोच्या सन्मानार्थ रु. 3, 00, 000/- (रुपये तीन लाख) रोख पुरस्कार तर अकादमी पुरस्कारामध्ये ताम्रपत्र आणि अंगवस्त्रम व्यतिरिक्त रु. 1,00,000/- (रुपये एक लाख) रोख पुरस्कार दिला जातो.
2022 आणि 2023 सालासाठी संगीत नाटक अकादमी अधिछात्रवृत्ति आणि पुरस्कारांसाठी निवडलेल्या कलाकारांच्या यादीसाठी येथे क्लिक करा:
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2011763)
Visitor Counter : 138