राष्ट्रपती कार्यालय

पर्यटक आता अमृत उद्यानाला सायंकाळी 5 ऐवजी 6 वाजेपर्यंत भेट देऊ शकतील

Posted On: 02 MAR 2024 11:40AM by PIB Mumbai

 

उद्यान उत्सव-1, 2024 अंतर्गत राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 31 मार्च 2024 पर्यंत जनतेसाठी खुले असणार आहे. आता पर्यटक सोमवार वगळता आठवड्यातून सहाही दिवस सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या कालावधीत उद्यानाला भेट देऊ शकतात (अंतिम प्रवेश सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत). यापूर्वी हे उद्यान जनतेसाठी  सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत खुले असायचे (अंतिम प्रवेश –  सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत).

अभ्यागताना या उद्यानाला भेट देण्यासाठी खालील लिंक वरती नोंदणी करावी लागेल.

https://visit.rashtrapatibhavan.gov.in/visit/amritudyan/rE.  नोंदणी न करता प्रत्यक्ष भेट देणाऱ्या( वॉक-इन) अभ्यागतांना राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 12 जवळील सुविधा केंद्रावर किंवा सेल्फ सर्व्हिस कियॉस्कवर (स्वयं सेवा केंद्रावर) स्वतःची नोंदणी करावी लागेल.

***

S.Tupe/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2010856) Visitor Counter : 76