पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी गुजरातमध्ये केले ओखा मुख्यमभूमी आणि  बेट द्वारका द्वीपाला जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे उद्घाटन

Posted On: 25 FEB 2024 11:16AM by PIB Mumbai


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये सुमारे 980 कोटी रुपये खर्चाने बांधण्यात आलेल्या ओखा मुख्यभूमी आणि बेट द्वारका द्वीपाला जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले. 2.32 किमी लांबी असलेला पूल देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल आधारित पूल आहे. 
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
“980 कोटी रुपये खर्चाने बांधण्यात आलेला, ओखा मुख्यभूमी आणि बेट द्वारका द्वीपाला जोडणाऱा सुदर्शन सेतू. 2.32 किमी लांबी असलेला पूल देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल आधारित पूल आहे.”
“ आश्चर्यकारक सुदर्शन सेतू!”

पार्श्वभूमी
वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेला असा सुदर्शन सेतू असून त्यावरील  पदपथांवर दोन्ही बाजूंना श्रीमद भग्वद गीतेमधील वचने  आणि भगवान कृष्णाच्या प्रतिमा आहेत. पदपथाच्या वरच्या भागात एक मेगावॉट वीज निर्माण करणारी सौर पॅनेल्स देखील बसवण्यात आली आहेत.या पुलामुळे द्वारका आणि बेत द्वारका दरम्यान भाविकांचा प्रवास सुलभ होईल आणि प्रवासाच्या वेळेत लक्षणीय कपात होईल. या पुलाच्या उभारणीपूर्वी भाविकांना बेट द्वारकाला पोहोचण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागत होता. मानबिंदू असलेला हा पूल देवभूमी द्वारकेचे प्रमुख पर्यटक आकर्षण देखील ठरेल. या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांसोबत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि खासदार सी. आर. पाटील उपस्थित होते.

 

***

M.Iyengar/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2008794) Visitor Counter : 84