पंतप्रधान कार्यालय

लखीसराय रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

Posted On: 21 FEB 2024 2:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 21 फेब्रुवारी 2024

बिहारच्या लखीसराय येथे झालेल्या  रस्ते अपघातातील जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

याबरोबरच जखमींची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी देखील त्यांनी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधान संदेशात म्हणाले:

"बिहारच्या लखीसराय इथे झालेला रस्ते अपघात अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत आप्त गमावलेल्यां प्रती माझ्या सहवेदना. याबरोबरच सर्व जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासन अपघातग्रस्तांची शक्यतोपरी मदत करत आहे : पंतप्रधान"

 

 

 

Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2007670) Visitor Counter : 70