पंतप्रधान कार्यालय
जैन संत आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज यांनी समाधी घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले
Posted On:
18 FEB 2024 10:58AM by PIB Mumbai
जैन संत आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज यांनी समाधी घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
मोदी यांनी सांगितले की आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांच्या निधनाने देशाची कधीही भरून न होणारी हानी झाली आहे. लोकांमध्ये आध्यात्मिक जागृती करण्यासाठी आचार्यजींनी केलेले बहुमूल्य प्रयत्न कायम स्मरणात राहतील, असे देखील पंतप्रधान म्हणाले. दारिद्र्य निर्मूलनाबरोबरच समाजामध्ये आरोग्य आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी ते आयुष्यभर झटत राहिले, असे मोदी यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी गेल्या वर्षी छत्तीसगडच्या चंद्रगिरी जैन मंदिरात आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला आणि ही भेट त्यांच्यासाठी अविस्मरणीय असेल असे सांगितले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले;
“आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज जी यांचे निधन म्हणजे देशासाठी कधीही भरून होणारी हानी आहे. लोकांमध्ये जागृतीसाठी त्यांचे बहुमूल्य प्रयत्न सदैव स्मरणात राहतील. त्यांचा मला सातत्याने आशीर्वाद मिळत राहिला हे माझे भाग्य आहे. गेल्या वर्षी छत्तीसगडच्या चंद्रगिरी जैन मंदिरात त्यांच्याशी झालेली भेट माझ्यासाठी कायम अविस्मरणीय राहील. त्यावेळी आचार्य जी यांच्याकडून मला भरपूर प्रेम आणि आशीर्वाद प्राप्त झाला होता. समाजासाठी त्यांचे अप्रतिम योगदान देशाच्या प्रत्येक पिढीला प्रेरित करत राहील.”
***
H.Akude/S/Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2006898)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam