कोळसा मंत्रालय
कोळसा मंत्रालयाने जानेवारी 2024 मध्ये 99.73 दशलक्ष टन उत्पादनाचा टप्पा गाठला
6.52% वाढीसह, कोळसा पाठवणीचा आकडा 87.37 एमटी वर पोहोचला
जानेवारी 2024 पर्यंत 798 मेट्रिक टन एकत्रित कोळसा पाठवणीची नोंद
प्रविष्टि तिथि:
05 FEB 2024 3:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 5 फेब्रुवारी 2024
कोळसा मंत्रालयाने जानेवारी 2024 मध्ये एकूण कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली असून, ते 99.73 दशलक्ष टन मेट्रिक टन वर (एमटी) पोहोचले आहे. मागील वर्षातील याच कालावधीत कोळसा उत्पादन 90.42 एमटी इतके होते, म्हणजेच यात 10.30% वृद्धी दिसून येत आहे.
जानेवारी 2024 मध्ये कोल इंडिया लिमिटेड (CIL) चे उत्पादन 78.41 एमटी वर पोहोचले असून, जानेवारी 2023 मधील 71.88 एमटी च्या तुलनेत यात 9.09 % वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष 23-24 मध्ये देशाच्या एकत्रित कोळसा उत्पादनाने (जानेवारी 2024 पर्यंत) 784.11 एमटी (तात्पुरती) इतकी लक्षणीय झेप घेतली असून, आर्थिक वर्ष 22-23 मधील याच कालावधीच्या 698.99 एमटी उत्पादनाच्या तुलनेत यामध्ये 12.18% वाढ दिसून येत आहे.

जानेवारी 2024 मध्ये कोळशाच्या 87.37 99 एमटी इतकी कोळसा पाठवणी झाली असून, जानेवारी 2023 मधील 82.02 एमटी कोळसा पाठवणीच्या तुलनेत यात 6.52% टक्के इतकी लक्षणीय वाढ नोंदवली गेली.
त्याच वेळी, कोल इंडिया लिमिटेडने (CIL) जानेवारी 2024 मध्ये 67.56 एमटी कोळसा रवाना करून उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. जानेवारी 2023 मध्ये हा आकडा 64.45 एमटी इतका होता, म्हणजेच यामध्ये 4.83% वाढ दिसून येत आहे.
आर्थिक वर्ष 23-24 मधील (जानेवारी 2024 पर्यंत) एकत्रित कोळसा पाठवणीचा आकडा 797.66 एमटी (तात्पुरता) इतका होता. आर्थिक वर्ष 22-23 मधील याच कालावधीतील 719.78 एमटी कोळसा पाठवणीच्या तुलनेत यामध्ये 10.82% इतकी प्रशंसनीय वाढ नोंदवली गेली आहे.

31.01.2024 पर्यंत, कोळसा कंपन्यांकडे असलेल्या कोळसा साठ्यामध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून, तो 70.37 एमटी वर पोहोचला. ही वाढ 47.85% इतकी आकर्षक वार्षिक वृद्धी दर्शवत असून, कोळसा क्षेत्राची मजबूत कामगिरी आणि कार्यक्षमता अधोरेखित करते. त्याच बरोबर, औष्णिक ऊर्जा केंद्रांमधील (TPP) कोळशाच्या साठ्यामध्ये, विशेषत: डीसीबी म्हणून ओळखल्या गेलेल्या ठिकाणी, त्याच तारखेला 15.26% च्या वार्षिक वाढीसह, 36.16 एमटी इतकी लक्षणीय वाढ नोंदवली गेली.
वरील आकडेवारी कोळसा क्षेत्राची लवचिकता आणि देशाची ऊर्जेची गरज पूर्ण करण्याची वचनबद्धता अधोरेखित करते. कोळसा मंत्रालय या क्षेत्रातील शाश्वत विकास आणि कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहे.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2002579)
आगंतुक पटल : 145