कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2023 योजना


नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत वाढवण्यात आली.

Posted On: 02 FEB 2024 11:29AM by PIB Mumbai

 

सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार, 2023 अंतर्गत नामांकने आणि नोंदणी 3 जानेवारी 2024 रोजी सुरू झाली.

खालील श्रेणींमध्ये नामांकने मागवण्यात आली होतीः -

श्रेणी 1 - 12 प्राधान्य क्षेत्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास. या श्रेणीत 10 पुरस्कार प्रदान केले जातील.

श्रेणी 2 : केंद्रीय मंत्रालये / विभाग, राज्ये, जिल्ह्यांसाठी नवोन्मेष. या श्रेणीत सहा पुरस्कार प्रदान केले जातील.

अर्जदारांनी अपलोड करण्याच्या माहितीची आवश्यकता आणि विविध संस्थांकडून प्राप्त झालेल्या विनंत्या लक्षात घेता, सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2023 अंतर्गत (www.pmawards.gov.in ) वेब-पोर्टलवर नोंदणी आणि ऑनलाईन नामांकने सादर करण्याची शेवटची तारीख 31.01.2024 वरून 12.02.2024 (1700 वाजेपर्यंत) करण्यात आली आहे.

***

JPS/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2001832) Visitor Counter : 76