युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
मेरा युवा भारत (MY Bharat) पोर्टलने केवळला तीन महिन्यात ओलांडला 1.45 कोटी युवा नोंदणीचा टप्पा
Posted On:
01 FEB 2024 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2024
मेरा युवा भारत(MY Bharat) या पोर्टलने 31-1-2024 रोजी 1.45 कोटींच्या वर नोंदणीचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. केवळ काही मिनिटातच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या ‘ यूजर फ्रेंडली इंटरफेस’मुळे हे शक्य झाले आहे. विधायक आणि परिवर्तनकारी उपक्रमांकडे देशातील युवा वर्गाला वळवण्यामध्ये या पोर्टलने आधीपासूनच आपला प्रभाव दाखवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिवस म्हणजेच 31 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्लीत कर्तव्य पथावर देशातील युवा वर्गासाठी मेरा युवा भारत(MY Bharat) या मंचाचा शुभारंभ केला. विकसित भारताच्या निर्मितीच्या आपल्या आकांक्षाची पूर्तता करण्यासाठी युवा वर्गाला सक्षम करण्यासाठी समान संधी देण्याच्या महत्त्वाच्या उद्दिष्टासह युवा वर्गाचा विकास आणि युवा प्रणीत विकासाला तंत्रज्ञानाच्या मदतीने चालना देणारा एक आस म्हणून माय भारत पोर्टलकडे पाहिले जात आहे. हा एक ‘फिजिटल’(फिजिकल+ डिजिटल) मंच असून त्यात डिजिटली जोडले जाण्याच्या संधीसह भौतिक कृतीचा समावेश आहे. भौतिक कृती आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी यांचे मिश्रण या मंचाच्या आधुनिक, गतिशील स्वरुपाचे दर्शन घडवत आहे.
देशभरातील युवा वर्ग माय भारत पोर्टलवर (https://www.mybharat.gov.in/) नोंदणी करू शकतो आणि पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विविध संधी आणि कार्यक्रमांसाठी साईन अप करू शकतो. युवा वर्गाच्या विकासाकरिता हे पोर्टल अतिशय झपाट्याने एक मध्यवर्ती साधन म्हणून उदयाला आले आहे ज्यामध्ये विविध संधी, कार्यक्रम पोलिस, शहरी स्थानिक संस्था(ULBs) आणि विविध मंत्रालये यांच्यासोबत स्वयंसेवक म्हणून करावयाचे विविध उपक्रम उपलब्ध आहेत. प्रवाशांना अधिक जास्त प्रमाणात रस्ते सुरक्षा पुरवण्यासाठी आणि अधिक चांगले वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय युवा दिनी, 12 जानेवारी 2024 रोजी एक लाखांहून जास्त स्वयंसेवकांनी देशभरात वाहतूक पोलिसांसोबत काम केले. माय भारतच्या यशाबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जानेवारी 2024 रोजी एनसीसी आणि एनएसएस च्या स्वयंसेवकांसोबत संवाद साधताना इतक्या कमी कालावधीत माय भारत पोर्टलला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाची माहिती दिली. 21व्या शतकातील भारताच्या युवा वर्गासाठी हा सर्वात मोठा मंच आहे असे त्यांनी या मंचाच्या अतिशय जलद आणि प्रभावी संपर्काला अधोरेखित करत सांगितले.
यापुढील काळाचा विचार करून, आपला प्रभाव वाढवण्यासाठी माय भारतचे नवीन वैशिष्ट्यांचा आणि उपक्रमांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट आहे. उदयोन्मुख क्षेत्रामधील आपल्या प्रस्तावांचा विस्तार करण्यामध्ये आणि शैक्षणि संस्था आणि युवा संघटनांसोबत अधिक जास्त प्रमाणात संपर्क प्रस्थापित करण्यात या मंचाचा भर आहे. आपली उत्क्रांतीची प्रक्रिया सुरू असताना माय भारत समान संधी उपलब्ध करून देण्याच्या आणि युवा वर्गात सातत्याने शिकण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या मोहिमेशी वचनबद्ध आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध संसाधने आणि विशेषज्ञांच्या मदतीने एकत्र करून आपल्या क्षमतेमध्ये वाढ करण्याचे मेरा युवा भारतचे उद्दिष्ट आहे. ही केवळ एक संघटना नाही तर 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याचा एक दृष्टीकोन आहे.
* * *
S.Bedekar/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2001635)
Visitor Counter : 267