माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआयएमसीला मिळाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा

Posted On: 31 JAN 2024 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2024

 

शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) सल्ल्यानुसार,  भारतीय जनसंवाद संस्था, या पत्रकारिता आणि जनसंवाद क्षेत्रातील शिक्षणासाठी एक अग्रगण्य संस्थेला विशिष्ट श्रेणीतील अभिमत विद्यापीठ म्हणून घोषित केले आहे. हा दर्जा आयआयएमसी नवी दिल्ली तसेच जम्मू (जम्मू आणि काश्मीर), अमरावती (महाराष्ट्र), ऐझवाल (मिझोरम), कोट्टयम (केरळ) आणि ढेंकनाल (ओडिशा) इथे असलेल्या पाच प्रादेशिक संस्थांनाही प्रदान करण्यात आला आहे.

या नवीन दर्जासह भारतीय जनसंवाद संस्था आता डॉक्टरेट पदवीसह इतर पदवी प्रदान करण्यासाठी अधिकृत संस्था असेल.

तपशीलवार अधिसूचना खालील लिंकवर वाचता येईल:

https://iimc.gov.in/WriteReadData/userfiles/file/2024/Jan/Notification.pdf

 

* * *

R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2000954) Visitor Counter : 129