शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी झालेल्यांशी साधला संवाद

Posted On: 29 JAN 2024 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2024

 

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राष्ट्रीय बाल भवन येथे परीक्षा पे चर्चाच्या 7 व्या आवृत्तीमध्ये सहभागी झालेल्यांशी संवाद साधला.  शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी आणि डॉ. सुभाष सरकार; परराष्ट्र व्यवहार आणि शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह; शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार;  इतर मान्यवर, शिक्षकआणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना प्रधान यांनी परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या, विशेषत: भारत मंडपम येथे उभारण्यात आलेल्या प्रदर्शनात आपले अभिनव संशोधन प्रदर्शित करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या केवळ विज्ञानच नव्हे तर कला आणि समाजशास्त्रातील  अभिनव कल्पना युवा पिढीमध्ये कल्पनांचे सामर्थ्य प्रदर्शित करतात असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणे आणि त्यांचे  मार्गदर्शन लाभणे हा विद्यार्थ्यांसाठी किती रोमांचक आणि आयुष्याला कलाटणी देणारा  अनुभव होता हे त्यांनी नमूद केले.

Image  Image

आपापल्या शाळांमध्ये परीक्षा पे चर्चाला उपस्थित राहण्याचा अनुभव सामायिक करण्याचे आवाहन प्रधान यांनी विद्यार्थ्यांना केले , जेणेकरुन इतर विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या गुरुमंत्रापासून  शिकण्याची प्रेरणा मिळेल. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा समावेश असलेल्या अंदाजे 50 कोटी लोकांच्या मोठ्या समुदायाला  तणावावर मात करण्याच्या अशा उपायांबाबत अवगत करायला हवे यावरही त्यांनी भर दिला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्येही  ही शिफारस केली आहे असे ते म्हणाले.

Image

कला उत्सवातील विजेते, एकलव्य आदर्श निवासी शाळांमधील विद्यार्थी आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसह 300हून अधिक सहभागींनी  प्रधान यांच्याशी संवाद साधला आणि परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शक विचार ऐकण्याचा अनुभव सामायिक  केला.

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2000458) Visitor Counter : 57