पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासह जयपूरमधील जंतरमंतरला दिली भेट

Posted On: 25 JAN 2024 11:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जानेवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत जयपूर येथील जंतरमंतरला भेट दिली.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले

"राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासमवेत जयपूरमधील जंतरमंतरला भेट दिली. हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ असून भारताच्या खगोलशास्त्रातील समृद्ध वारशाचा दाखला आहे.  भारत आणि फ्रान्सची सामायिक मूल्ये असलेली   प्राचीन विद्वत्ता  आणि आधुनिक विज्ञानाच्या मिलाफाचे हे  प्रतीक आहे." 

 

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1999795) Visitor Counter : 59