माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीआयबी फोटो फिचर


श्री राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अकरा दिवसांचे विशेष अनुष्ठान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विविध देवस्थानांना भेट आणि विविध भाषांमधील रामायणपाठांचे श्रवण

Posted On: 21 JAN 2024 7:01PM by PIB Mumbai

 

नाशिक येथील काळाराम मंदिरात,12 जानेवारी 2024 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांच्या पवित्र अनुष्ठानाला सुरुवात केली असून 22 जानेवारी रोजी अयोध्याधाम येथील मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेपर्यंत हे अनुष्ठान सुरू राहणार आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी बराच काळ व्यतीत केलेल्या  नाशिक धाम- पंचवटी इथून पंतप्रधानांनी अनुष्ठानाला सुरुवात केली.

Image

श्री काळाराम मंदिर, नाशिक

12 जानेवारी 2024 रोजी, पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील नाशिक येथे असलेल्या काळाराम मंदिरात प्रार्थना आणि पूजा केली.  त्यांनी श्री राम कुंड येथेही दर्शन आणि  पूजा केली.  रामाच्या अयोध्या येथील  विजयी पुनरागमनाचे वर्णन करणाऱ्या रामायणातील युद्धकांडया भागाचे  पंतप्रधानांसमोर मराठी भाषेत  पठण करण्यात आले.  संत एकनाथजींनी मराठीत लिहिलेल्या भावार्थ रामायणातील श्लोकही पंतप्रधानांनी ऐकले.

1.png

वीरभद्र मंदिर, लेपाक्षी,आंध्रप्रदेश

पंतप्रधानांनी 16 जानेवारी 2024 रोजी आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी इथल्या लेपाक्षी मधील वीरभद्र मंदिरात जाऊन पूजा केली.पंतप्रधानांनी तेलुगू भाषेतील रंगनाथ रामायण ऐकले आणि आंध्र प्रदेशातील थोलू बोम्मलता या प्राचीन छाया कठपुतळी कला प्रकारात सादर केलेली  जटायूची कथा पाहिली.

गुरुवायूर मंदिर,त्रिसूर, केरळ 

केरळ मधल्या गुरुवायूर इथल्या गुरुवायूर मंदिरालाही भेट देऊन पंतप्रधानांनी पूजा केली.

3.png

त्रिप्रयार श्री रामस्वामी मंदिर,त्रिशूर, केरळ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जानेवारी 2024 रोजी केरळमधील त्रिप्रयार येथे श्री रामस्वामींच्या दिव्य मठाला भेट दिली. त्यांनी श्री रामास्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली.  पंतप्रधान सांस्कृतिक कार्यक्रमालाही उपस्थित राहिले  आणि कलाकार तसेच बटुंचा सत्कारही केला.

4.png

श्री रंगनाथस्वामी मंदिर,तिरुचिरापल्ली, तमिळनाडू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  20 जानेवारी 2024 या शुभ दिवशी, तामिळनाडूमधील श्री रंगनाथस्वामींच्या पवित्र मंदिराला भेट दिली.  त्यांनी या पवित्र स्थळी कम्ब रामायणातील काव्यात्मक सादरीकरण ऐकले. याच ठिकाणी प्रसिद्ध कंबन यांनी सर्वप्रथम त्यांची उत्कृष्ट कलाकृती जगासमोर सादर केली होती.

श्री अरुल्मिगु रामनाथस्वामी मंदिर, रामेश्वरम 

श्री रंगनाथस्वामी मंदिरात पूजा केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील अरुल्मिगु रामनाथस्वामी यांच्या पवित्र मठाला भेट दिली.  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून पूज्य असलेल्या रामेश्वराला त्यांनी भक्तीभावाने श्रद्धासुमने   अर्पण केली.  ते भजनसंध्ये सारख्या विविध कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी  झाले. मंदिराच्या आवारात  संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमात अनेक भक्तीगीते सादर करण्यात आली.

6.png

कोदंडरामस्वामी मंदिर, धनुष्कोडी

आज पंतप्रधानांनी धनुष्कोडी येथील कोदंडरामस्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि पूजा केली.  धनुष्कोडीजवळ, पंतप्रधानांनी अरिचल मुनईला देखील भेट दिली. इथेच रामसेतू बांधायला सुरुवात झाली होती  असे मानले जाते.

setu.png

***

N.Chitale/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1998453) Visitor Counter : 131