गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज शिलाँग मधील लैटकोर स्थित आसाम रायफल्स महासंचालनालयाच्या मुख्यालयाला दिली भेट
केंद्रीय गृहमंत्र्यांनी आसाम रायफल्सच्या मुख्यालयातील युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण केले आणि कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहीदांना आदरांजली वाहिली
अमित शाह यांनी आसाम रायफल्सच्या जवानांच्या मनोधैर्याची प्रशंसा केली , आसाम रायफल्सच्या शूरवीरांनी आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी दिलेले बलिदान अतुलनीय आहे आणि राष्ट्र त्यांच्या बलिदानाप्रति सदैव ऋणी राहील
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2024 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 19 जानेवारी 2024
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज शिलाँग मधील लैटकोर स्थित आसाम रायफल्स महासंचालनालयाच्या मुख्यालयाला भेट दिली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आसाम रायफल्स मुख्यालयातील युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले आणि कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

अमित शाह यांनी आसाम रायफल्सच्या जवानांच्या मनोधैर्याची प्रशंसा केली आणि आसाम रायफल्सच्या शूरवीरांनी आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी दिलेले बलिदान अतुलनीय आहे आणि राष्ट्र त्यांच्या बलिदानाप्रति सदैव ऋणी राहील, असे सांगितले.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी काल आसाम रायफल्सच्या मुख्यालयात मध्ये सायबर सुरक्षा परिचालन केंद्राचे उद्घाटन केले होते, जे सायबर हल्ल्यांचे धोके रोखण्यासाठी दलासाठी सहाय्यक ठरेल.
S.Kakade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1997750)
आगंतुक पटल : 135