पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान, 18 जानेवारी रोजी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद
विकसित भारत संकल्प यात्रेचे देशभरातील हजारो लाभार्थी कार्यक्रमात होणार सहभागी
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2024 7:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 17 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी, 18 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधतील. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना मार्गदर्शनही करणार आहेत.
विकसित भारत संकल्प यात्रेचे देशभरातील हजारो लाभार्थी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील प्रतिनिधीही सहभागी होतील.
विकसित भारत संकल्प यात्रेचा 15 नोव्हेंबर 2023 रोजी प्रारंभ झाल्यापासून पंतप्रधानांनी देशभरातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी नियमितपणे संवाद साधला आहे. पैकी पाचवेळा (30 नोव्हेंबर, 9 डिसेंबर, 16 डिसेंबर, 27 डिसेंबर आणि 8 जानेवारी, 2024) हा संवाद दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून साधला आहे. तर पंतप्रधानांनी गेल्या महिन्यात त्यांच्या वाराणसी दौऱ्यादरम्यान सलग दोन दिवस (17-18 डिसेंबर) विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
सरकारच्या योजनांचे लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत कालबद्ध रीतीने पोहोचतील याची खातरजमा करून सरकारच्या प्रमुख योजना 100 टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने देशभरात 'विकसित भारत संकल्प यात्रा' आयोजित केली जात आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेतील सहभागींची संख्या 15 कोटींच्या पुढे गेली आहे. यात्रेने, प्रत्यक्ष लोकांमधे सखोल प्रभाव निर्माण केला असून त्याच्या यशाचीच ही साक्ष आहे. देशभरातील लोकांना ती विकसित भारताच्या सामायिक दृष्टीकोनातून एकत्र आणत आहे.
N.Chitale/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1997069)
आगंतुक पटल : 171
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam