आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अवास्तव माहिती विरुद्ध वस्तुस्थिती


9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी सरकार एचपीव्ही लसीकरण मोहीम राबवणार असल्याचा दावा करणाऱ्या प्रसारमाध्यमांमधील बातम्या खोट्या आणि अपप्रचार करणाऱ्या

एचपीव्ही लसीकरणाची सुरुवात करण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप निर्णय घेतलेला नाही

Posted On: 13 JAN 2024 4:36PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकार 2024 या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस(HPV)  लसीकरण मोहीम सुरू करणार असल्याचे अंदाज काही प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमधून वर्तवले जात आहेत. मात्र, या बातम्या खोट्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात एचपीव्ही लसीकरण सुरू करण्याबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. देशातील सर्वायकल( गर्भाशयमुखाच्या) कर्करोगाच्या प्रकरणांवर मंत्रालयाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे आणि या संदर्भात राज्ये आणि विविध आरोग्य विभागांसोबत मंत्रालय नियमितपणे संपर्कात आहे.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1995868) Visitor Counter : 233