गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

वाढती प्रवासी संख्या ही भारतातील मेट्रो रेल्वे सेवेची वृद्धी दर्शवते


देशातील सर्व मेट्रो रेल्वे प्रणालींमधून दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या 10 दशलक्ष पेक्षा अधिक झाली

Posted On: 06 JAN 2024 9:37AM by PIB Mumbai

 

द इकॉनॉमिस्ट या वृत्तपत्राने 23 डिसेंबर 2023 रोजीच्या आपल्या वर्ष-अखेरच्या ख्रिसमस डबलया आपल्या अंकात भारताच्या मेट्रो रेल्वे प्रणालींवरील लेखात भारतात मोठ्या प्रमाणावर उभारली जाणारी मेट्रो रेल्वे सेवा प्रवाशांना हव्या त्या प्रमाणात आकर्षित करण्यात अपयशी ठरत आहेअसा चुकीचा अर्थ काढला होता.  या लेखात तथ्यात्मक अचूकपणाचा अभावाबरोबर , भारताच्या वाढत्या मेट्रो रेल्वे नेटवर्कचा अभ्यास करणे आवश्यक काआहे याबाबत आवश्यक असलेला संदर्भ देखील दिलेला नाही.

भारतातील कोणत्याही मेट्रो रेल्वे प्रणालीने त्यांच्या अंदाजित प्रवासी संख्येपैकी निम्मे लक्ष्य सुध्दा साध्य केले नसल्याचा  दावा या लेखात करण्यात आला असून हा दावा करताना या वस्तुस्थितीकडे लक्ष दिले गेले नाही की भारताच्या सध्याच्या मेट्रो रेल्वेच्या तीन चतुर्थांश नेटवर्कची कल्पना, बांधणी आणि कार्यान्वयन दहा वर्षांपूर्वीच करण्यात आले होते. - काही प्रकरणांमध्ये, मेट्रो रेल्वे प्रणाली केवळ दोन वर्षांची आहे. तरीही, देशातील मेट्रो प्रणालींमध्ये दैनंदिन प्रवासी संख्येने आधीच 10 दशलक्ष ओलांडली आहे आणि एक-दोन वर्षांत  ही प्रवासी संख्या 12.5 दशलक्षांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. भारत आपल्या मेट्रो प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ पाहत असून आपली मेट्रो प्रणाली जसजशी विकसित होत जाईल तसतशी प्रवासी संख्या अशीच वाढत राहील. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, देशातील जवळपास सर्व मेट्रो रेल्वे प्रणाली सध्या आपल्या सेवेतून नफा कमावत आहेत.

प्रगल्भ मेट्रो प्रणालीमध्ये ओळख असलेल्या दिल्ली मेट्रो हेच उदाहरण घेतले तर, या मेट्रो रेल्वेची दैनंदिन प्रवासी संख्येने आधीच 7 दशलक्ष प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडला आहे, जो 2023 च्या अखेरीस दिल्ली मेट्रोसाठी अंदाजित संख्ये पेक्षा खूपच अधिक आहे.

भारत सरकार आरामदायी, विश्वासार्ह आणि ऊर्जा- बचत करणारे गतिशीलता समाधान प्रदान करण्यासाठी वचनबद्ध असून दीर्घकालीन टिकाऊ पद्धतीने बहु-मोडल वाहतूक पर्यायांचे नियोजन करत आहे.

या लेखात असेही सांगण्यात आले आहे की, अनेक प्रवासी जे लहान सहली साठी जात असतात ते ते सुद्धा यावेळी वाहतुकीच्या इतर पर्यायांना प्राधान्य देतात, त्याचबरोबर अशा प्रकारच्या "महागड्या वाहतूक पायाभूत सुविधा" समाजाच्या सर्व स्तरांना सेवा पुरवण्यात अपयशी ठरतात. असे सांगत असताना या लेखात भारतीय शहरे विस्तारत आहेत हे गृहीत धरले नसल्यामुळे हा मुद्दा सुद्धा संदर्भहीन ठरतो. 20 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या डीएमआरसी मेट्रो प्रणालीची सरासरी प्रवासाची लांबी 18 किमी आहे. भारतातील मेट्रो प्रणाली, ज्यापैकी बहुतेक पाच किंवा दहा वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या आहेत, त्या सुद्धा पुढील 100 वर्षांसाठी भारताच्या शहरी भागातील रहदारीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी नियोजित आणि कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या सर्व  पुराव्यांवरून हेच सिद्ध होते की आपल्या मेट्रो प्रणाली मध्ये कशाप्रकारे संक्रमण होत आहे आणि आपली मेट्रो रेल्वे प्रणाली ही महिला आणि शहरातील तरुण लोकसंख्येसाठी सर्वात पसंतीची वाहतूक प्रणाली ठरत आहे.

***

JPS/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1993748) Visitor Counter : 113