दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
आणखी 37 उत्पादने सुलभीकृत प्रमाणीकरण योजनेच्या कक्षेत समाविष्ट
प्रमाणीकरणासाठी लागणारा कालावधी आठ आठवड्यांवरून कमी करुन दोन आठवड्यांवर आणण्यात आला
मूल्यांकन शुल्क पूर्णपणे माफ
Posted On:
02 JAN 2024 11:11AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 02 जानेवारी 2024
केंद्रीय दूरसंचार विभागातील (डीओटी) दूरसंचार अभियांत्रिकी केंद्राच्या (टीईसी) तंत्रज्ञान शाखेने काल, दिनांक 01 जानेवारी 2024 पासून आणखी 37 उत्पादने सुलभीकृत प्रमाणीकरण योजनेच्या (एससीएस) कक्षेत आणली आहेत. यामुळे, उत्पादनांच्या प्रमाणीकरणासाठी लागणारा कालावधी आठ आठवड्यांवरून दोन आठवड्यांपर्यंत कमी होईल आणि त्यातून व्यापार करण्यातील सुलभतेला आणखी चालना मिळेल. या उत्पादनांमध्ये मिडिया गेटवे, आयपी सुरक्षा साधने, आयपी टर्मिनल्स, ऑप्टिकल फायबर किंवा केबल, प्रसारण टर्मिनल साधने, इत्यादींचा समावेश आहे. यामुळे एससीएसच्या कक्षेत असणाऱ्या एकूण उत्पादनांची संख्या आता बारा वरुन एकोणपन्नास पर्यंत पोहोचली आहे.
तसेच 1 जानेवारी 2024 पासून एमटीसीटीई अंतर्गत सादर झालेल्या अत्यावश्यक गरजांवर (ईआर) आधारित अर्जांसाठी टीईसी कडून केवळ प्रशासकीय शुल्क आकारण्यात येईल आणि त्यासाठी त्या अर्जाची जीसीएस आणि एससीएस वर्गवारी लक्षात घेतली जाणार नाही.
नव्या निर्णयानुसार, मूल्यांकन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. यामुळे अर्ज शुल्कात 80% हून अधिक कपात होणार असल्याने आणि त्यायोगे नियमांचा बोजा आणखी कमी होणार असल्याने ओईएम म्हणजेच मूळ उत्पादन निर्माते किंवा अर्जदार यांच्यासाठी हा मोठा दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे.आजघडीला, एमटीसीटीईअंतर्गत साठ दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादने अधिसूचित करण्यात आलेली आहेत.
***
Sonal T/Sanjana C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1992306)
Visitor Counter : 164