युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
‘मेरा युवा भारत पोर्टल’ वर नोंदणी केलेल्या युवकांच्या संख्येने 35 लाखांचा टप्पा केला पार
‘मेरा युवा भारत मंच’ आता देशातील युवक-युवतींसाठी एक मोठी संस्था बनत आहे : पंतप्रधान
Posted On:
27 DEC 2023 8:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2023
‘मेरा युवा भारत पोर्टल’ वर नोंदणी केलेल्या युवकांची संख्या 26, डिसेंबर, 2023 पर्यंत 35 लाखांच्या पुढे गेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर बाल दिवस कार्यक्रमामध्ये केलेल्या भाषणात तरुणांना पोर्टलवर नोंदणी करून मेरा युवा भारत (MY भारत) पोर्टलवर मोठ्या संख्येने नोंदणी करून सामील होण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, युवकांना विकसित भारताच्या स्वप्नांशी आणि संकल्पाशी जोडण्याच्या देशव्यापी मोहिमेविषयी यावेळी सांगितले. त्यांनी प्रत्येक तरुणांना MY-भारत पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आमंत्रित केले. "हे व्यासपीठ आता देशातील तरुण युवक आणि युवतींसाठी एक मोठी संस्था बनत आहे," असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
अलिकडच्या काळात झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या यशावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी नमूद केले की, बहुतांश खेळाडू ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय ‘ खेलो इंडिया’ मोहिमेला दिले. खेलो इंडियाने त्यांच्या घराजवळ क्रीडा विषयक उत्तम सुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. तसेच पारदर्शक निवड प्रक्रिया सुनिश्चित केली आहे. युवकांच्या कल्याणाला प्राधान्य दिल्याचा हा परिणाम आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
देशभरातील तरुण ‘MY भारत पोर्टल’ वर ( https://www.mybharat.gov.in/ ) नोंदणी करू शकतात आणि पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विविध संधी आणि कार्यक्रमांसाठी नाव नोंदवू शकतात.
मेरा युवा भारत (माय भारत) विषयी माहिती :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2023 रोजी देशातील तरुणांसाठी 'मेरा युवा भारत (MY भारत)' हे व्यासपीठ नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर सुरू केले. यामागे अशी कल्पना आहे की, युवा पिढीचा विकास साधणे, तरुणांसाठी तंत्रज्ञान-आधारित सुविधा प्रदान करणे आहे. तरुणांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्याबरोबरच त्यांचे “विकसित भारत” च्या निर्मितीमध्ये योगदान असावे, यासाठी समान संधी उपलब्ध करून देण्याच्या व्यापक उद्दिष्टासह विकासाचे नेतृत्व करावे, अशी आहे. हे 'फिजिटल प्लॅटफॉर्म' (भौतिक + डिजिटल) असून त्यात प्रत्यक्ष विविध कृतींसह डिजिटली जोडले जाण्याची संधी आहे.
N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1991060)
Visitor Counter : 111