गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री,  अमित शहा यांनी आज वीर बाल दिनानिमित्त, पश्चिम बंगालमधील  कोलकाता येथे  श्री बडीसंगत साहिब गुरुद्वारा येथे दर्शन घेऊन त्यांचे घेतले आशीर्वाद

Posted On: 26 DEC 2023 4:15PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, अमित शहा यांनी आज वीर बाल दिवसानिमित्त कोलकाता, पश्चिम बंगाल श्री बडीसंगत साहिब येथील गुरुद्वारात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या ऐतिहासिक गुरुद्वाराला गुरू नानक देव जी आणि गुरु तेग बहादूर जी यांच्या संगतचा आशीर्वाद आहे.

आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये, केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, वीर बाल दिवसानिमित्त सत्संगाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला आज लाभले.

गुरू गोविंदसिंहजींच्या साहिबजादे यांनी बालवयात धर्म आणि सत्याच्या रक्षणासाठी केलेले बलिदान आपल्या सर्वांना पुढील युगांपर्यंत प्रेरणा देत राहील, असे ते यावेळी म्हणाले.

एक्स  प्लॅटफॉर्मवरील आपल्या दुसर्‍या पोस्टमध्ये, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, अमित शहा यांनी वीर बाल दिवसानिमित्त गुरु गोविंद सिंग जी यांचे चार साहिबजादे आणि माता गुजरी जी यांना नमन केले. अत्यंत शौर्याने ते क्रूर  राजवटीविरुद्ध उभे राहिले आणि धर्मांतर करण्यास नकार देत त्यांनी हौतात्म्य पत्करले, असे गृहमंत्री म्हणाले. त्यांचे अतुलनीय शौर्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या या हौतात्म्याचा दिवस वीर बाल दिवस म्हणून घोषित करून पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बलिदानाची गाथा देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आहे.

***

S.Bedekar/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1990614) Visitor Counter : 69