रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 1000 कोटी रुपयांच्या विक्रीचे उद्दिष्ट केले साध्य


या योजनेमुळे, गेल्या नऊ वर्षात रुग्णांच्या सुमारे 25000 कोटी रुपयांची बचत

Posted On: 20 DEC 2023 6:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2023 

 

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेने (PMBJP) या वर्षात, 1000 कोटी रुपयांच्या औषधांची विक्री करत, जेनेरीक औषधांच्या क्षेत्रात एक नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. देशातल्या जनतेमुळेच, ही उद्दिष्टप्राप्ती शक्य झाली असून, सध्या देशातल्या 785 जिल्ह्यात असलेल्या जन औषधी केंद्रातून औषधे विकत घेतल्यामुळे लोकांच्या सुमारे 5000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. जन औषधी केंद्रातून होणाऱ्या विक्रीत झालेली ही लक्षणीय वाढ, अधिकाधिक समुदायांना सेवा देत, व्यापक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या योजनेच्या वचनबद्धतेचाच पुरावा आहे.

गेल्या 9 वर्षात, जन औषधी केंद्रांच्या संख्येत 100 पटीहून अधिक वाढ झाली आहे.  2014 मध्ये ही संख्या केवळ 80 होती आणि आता ती वाढून देशातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांचा समावेश असलेली सुमारे 10,000 केंद्रे  सुरू झाली आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या 2023 च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशभरात 25,000 प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे उघडण्याची घोषणा केली होती.

पंतप्रधानांनी 30 नोव्हेंबर 2023 रोजी झारखंडमधील देवघर येथील एम्स येथे 10,000 व्या जनऔषधी केंद्राचा आभासी पद्धतीनं शुभारंभ केला. देशातल्या लोकांपर्यंत, सहजपणे औषधे पोहोचण्यात यामुळे मोठी मदत होत आहे.

मार्च 2026 पर्यंत देशभरात 25,000 जनऔषधी केंद्रे उघडण्याचे लक्ष्य, सरकारने निश्चित केलं आहे.   त्यानुसार,  देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन जनऔषधी केंद्रे उघडण्यासाठी ऑनलाइन अर्ज पीएमबीआयच्या अधिकृत वेबसाइटद्वारे, i.e. - www.janaushadhi.gov. केला जाऊ शकेल. तसेच सविस्तर माहितीसाठी, कोणीही राष्ट्रीय टोल-फ्री क्रमांक 1800.180.8080. द्वारे संपर्क साधू शकतो.

दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधांचा पुरवठा करण्यासाठी देशभरात 36 वितरक कार्यरत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पीएमबीजेपीने आपल्या उत्पादनात अनेक आयुर्वेदिक उत्पादने जोडली आहेत आणि ती लोकांना परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध आहेत.

 

* * *

S.Bedekar/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1988853) Visitor Counter : 111