पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

श्री गुरू तेग बहादूर सिंह यांच्या हुतात्मादिनी पंतप्रधानांचे त्यांना अभिवादन

Posted On: 17 DEC 2023 1:24PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  श्री गुरू तेग बहादूर सिंह यांच्या हुतात्मादिनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्य आणि माणसाची प्रतिष्ठा जपण्यासाठी श्री गुरू तेग बहादूर जी यांनी केलेल्या अद्वितीय त्यागाचा प्रतिध्वनी कालातीत उमटत राहील आणि माणुसकीला एकात्मता व अनुकंपेने जगण्यासाठी प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी X वरील संदेशात म्हटले आहे,

आज आपण श्री गुरू तेग बहादूर जी यांच्या धैर्य आणि ताकदीची प्रचिती देणाऱ्या त्यांनी पत्करलेल्या हौतात्म्याचे स्मरण करत आहोत. यांनी केलेल्या अद्वितीय त्यागाचा प्रतिध्वनी कालातीत उमटत राहील आणि मनुष्यजातीला एकात्मता व अनुकंपेने जगण्यासाठी प्रेरणा देत राहील. एकता आणि नैतिकतेने जगण्याची त्यांची शिकवण आपला बंधुत्व आणि शांतीकडे जाणारा मार्ग उजळत राहील.

पंतप्रधानांचा X वरील संदेश पुढीलप्रमाणे

“ਅੱਜ, ਅਸੀਂ ਸਾਹਸ ਅਤੇ ਸ਼ਕਤੀ ਦੇ ਪ੍ਰਤੀਕ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਤੇਗ਼ ਬਹਾਦਰ ਜੀ ਦੀ ਸ਼ਹਾਦਤ ਨੂੰ ਯਾਦ ਕਰ ਰਹੇ ਹਾਂ। ਸੁਤੰਤਰਤਾ ਅਤੇ ਮਾਨਵੀ ਮਾਣ- ਸਨਮਾਨ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਬੇਮਿਸਾਲ ਕੁਰਬਾਨੀ ਸਦਾ ਗੂੰਜਦੀ ਰਹਿੰਦੀ ਹੈ, ਜੋ ਮਾਨਵਤਾ ਨੂੰ ਇਮਾਨਦਾਰੀ ਅਤੇ ਦਇਆ ਨਾਲ ਰਹਿਣ ਲਈ ਪ੍ਰੇਰਿਤ ਕਰਦੀ ਹੈ।  ਏਕਤਾ ਅਤੇ ਸਚਾਈ 'ਤੇ ਜ਼ੋਰ ਦੇਣ ਵਾਲੀਆਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਸਿੱਖਿਆਵਾਂ, ਭਾਈਚਾਰੇ ਅਤੇ ਸ਼ਾਂਤੀ ਦੀ ਤਲਾਸ਼ ਵਿੱਚ ਸਾਡਾ ਮਾਰਗਦਰਸ਼ਨ ਕਰਦੀਆਂ ਹਨ।”

***

NM/R.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1987485) Visitor Counter : 83