गृह मंत्रालय

सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार


सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच्या निर्णयामुळे परदेशी पर्यटकांसाठी दरवाजे खुले होतील आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातही वृद्धी होईल

Posted On: 16 DEC 2023 12:33PM by PIB Mumbai

सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

आपल्या X प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले, “सुरत हे केवळ चकाकणाऱ्या हिऱ्यांसाठीच नव्हे तर त्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृती आणि गौरवशाली वारशामुळे पर्यटकांसाठी एक अमूल्य ठेवा आहे. सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच्या निर्णयामुळे परदेशी पर्यटकांसाठी दरवाजे खुले होतील आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातही वृद्धी होईल. आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून दर्जा देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे मी मनापासून आभार मानतो.”

Surat is a treasure trove for travelers not only because of its glittering diamonds but also for its diverse culture and vibrant heritage. The elevation of the Surat Airport to an international one will open doors for foreign tourists and also will enhance foreign trade.

My… pic.twitter.com/dJsZLMY9Py

— Amit Shah (@AmitShah) December 16, 2023

***

SonalT/VPY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1987105) Visitor Counter : 95