पंतप्रधान कार्यालय
केंद्रीय विद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त या परिवारातील विद्यार्थी, कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
आपल्या राष्ट्राचे भविष्य घडवण्यात केंद्रीय विद्यालयांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
15 DEC 2023 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2023
केंद्रीय विद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
केंद्रीय विद्यालय परिवाराच्या सर्व विद्यार्थी, कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांना हीरक महोत्सवानिमित्त शुभेच्छा! या प्रतिष्ठित शैक्षणिक समुदायाच्या उल्लेखनीय कामगिरीचा सोहळा साजरा करण्याचा आणि त्यांचे कौतुक करण्याचे एक निमित्त आहे. गेल्या काही वर्षांत, केंद्रीय विद्यालयांनी अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन आपल्या राष्ट्राचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
शैक्षणिक उत्कृष्टता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे योगदान खरोखरच प्रशंसनीय आहे.”
* * *
S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1986763)
आगंतुक पटल : 121
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam