आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

मिथके विरुद्ध तथ्ये


गर्भनिरोधक वस्तूंच्या खरेदीत अपयश आल्याचा दावा करणारे माध्यम अहवाल चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत

राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गर्भनिरोधकांचा सध्याचा साठा पुरेसा आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे निविदा प्रक्रियेचे बारकाईने निरीक्षण आणि मंत्रालयाच्या विविध कार्यक्रमांसाठी सीएमएसएस द्वारे खरेदी केल्या जाणार्‍या विविध औषधे आणि वैद्यकीय वस्तूंच्या पुरवठा स्थितीवर लक्ष.

Posted On: 12 DEC 2023 10:06AM by PIB Mumbai

देशाची केंद्रीय खरेदी संस्था, केन्द्रीय वैद्यकीय सेवा संस्था (सीएमएसएस)  गर्भनिरोधक वस्तूंच्या खरेदीत अयशस्वी झाली आहे. त्यामुळे भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा आरोप करणारे काही माध्यम अहवाल आले आहेत. असे अहवाल चुकीचे असून  दिशाभूल करणारी माहिती देणारे आहेत.

नवी दिल्लीतली केन्द्रीय वैद्यकीय सेवा संस्था (सीएमएसएस), एक स्वायत्त संस्था असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली केंद्रीय खरेदी एजन्सी आहे.  राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी ती कंडोम खरेदी करते. सीएमएसएसने मे, 2023 मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी 5.88 कोटी कंडोम खरेदी केले. कुटुंब नियोजन कार्यक्रमाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कंडोमचा सध्याचा साठा
पुरेसा आहे.

सध्या, एनएसीओ ला मेसर्स एचएलएल लाईफ केअर लिमिटेड कडून 75% मोफत कंडोमचा पुरवठा होत आहे.  सीएमएसएस सोबत झालेल्या अलीकडील मंजूरींच्या आधारावर 2023-24 साठी उर्वरित 25% मात्रा ठेवण्याची तयारी ते करत आहे. मेसर्स एचएलएल लाईफ केअर लिमिटेड कडून ऑर्डर केलेल्या 66 दशलक्ष कंडोमद्वारे एनएसीओ ची आवश्यकता पूर्ण केली जात आहे. ऑर्डर सध्या पुरवठाच्या अधीन आहे आणि एका वर्षाच्या आवश्यकतेसाठी मागणीपत्र सक्षम अधिकाऱ्याच्या मान्यतेने मेसर्स एचएलएल लाईफ केअर लिमिटेड आणि सीएमएसएस यांच्याकडे ठेवले जातील. सीएमएसएस द्वारे खरेदीला विलंब झाल्यामुळे तुटवड्याचे कोणतेही उदाहरण नाही.

सीएमएसएसने चालू आर्थिक वर्षात विविध प्रकारच्या कंडोमच्या खरेदीसाठी आधीच निविदा प्रकाशित केल्या आहेत आणि या निविदा अंतिम टप्प्यात आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मंत्रालयाच्या विविध कार्यक्रमांसाठी सीएमएसएस द्वारे निविदा प्रक्रिया, विविध औषधे आणि वैद्यकीय वस्तूंच्या पुरवठा स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रालयात साप्ताहिक आढावा बैठक घेतली जात असल्याने काळजी करण्याचे कारण नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  


****

Sonal T/Vinayak/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1985313) Visitor Counter : 92