पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कलम 370 रद्द करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ऐतिहासिक : पंतप्रधान


जम्मू , काश्मीर आणि लडाखच्या नागरिकांच्या स्वप्नपूर्तीसाठी कायम वचनबद्ध राहण्याची पंतप्रधानांची ग्वाही

Posted On: 11 DEC 2023 3:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2023

कलम 370 रद्द करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ऐतिहासिक आणि भारताच्या संसदेने 5 ऑगस्ट  2019 रोजी घेतलेला निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध ठरवणारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

न्यायालयाने आपल्या प्रगल्भ दृष्टिकोनातून, आपण भारतीय म्हणून ज्याला सर्वोच्च मानतो, ते एकतेचे सार अधिक प्रगाढ केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे :

कलम 370 रद्द करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ऐतिहासिक आणि भारताच्या संसदेने 5 ऑगस्ट  2019 रोजी घेतलेला निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध ठरवणारा आहे. जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील आपल्या बंधू- भगिनींसाठी आशा, प्रगती आणि एकतेची दमदार घोषणा आहे. न्यायालयाने आपल्या प्रगल्भ दृष्टिकोनातून, आपण भारतीय म्हणून ज्याला सर्वोच्च मानतो, ते एकतेचे सार अधिक प्रगाढ केले आहे.

मी जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या संयमी लोकांना ग्वाही देऊ इच्छितो, तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कायम वचनबद्ध आहोत. प्रगतीची फळे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीकलम 370 मुळे पीडित समाजातील सर्वात दुर्बल आणि वंचितांपर्यंतदेखील त्याचे लाभ पोहोचवले जाण्याच्या सुनिश्चितीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

आजचा हा निकाल केवळ एक कायदेशीर निर्णय म्हणून मर्यादित नाही, तर हा आशेचा एक किरण आहे, उज्वल भविष्याचे हे आश्वासन आहे आणि एक मजबूत, अधिक एकजूट भारत निर्माणासाठीच्या सामूहिक संकल्पाचा दाखला आहे.

"आर्टिकल 370 हटाने को लेकर सुप्रीम कोर्ट का आज का निर्णय ऐतिहासिक है, जो 5 अगस्त, 2019 को संसद में लिए गए फैसले पर संवैधानिक मुहर लगाता है। इसमें जम्मू, कश्मीर और लद्दाख के हमारे भाई-बहनों के लिए उम्मीद, उन्नति और एकता का एक सशक्त संदेश है। माननीय कोर्ट के इस फैसले ने हमारी राष्ट्रीय एकता के मूल भाव को और मजबूत किया है, जो हर भारतवासी के लिए सर्वोपरि है।

मैं जम्मू, कश्मीर और लद्दाख के अपने परिवारजनों को विश्वास दिलाना चाहता हूं कि आपके सपनों को पूरा करने के लिए हम हर तरह से प्रतिबद्ध हैं। हम यह सुनिश्चित करने के लिए संकल्पबद्ध हैं कि विकास का लाभ समाज के हर वर्ग तक पहुंचे। आर्टिकल 370 का दंश झेलने वाला कोई भी व्यक्ति इससे वंचित ना रहे।

आज का निर्णय सिर्फ एक कानूनी दस्तावेज ही नहीं है, बल्कि यह आशा की एक बड़ी किरण भी है। इसमें उज्ज्वल भविष्य का वादा है, साथ ही एक सशक्त और एकजुट भारत के निर्माण का हमारा सामूहिक संकल्प भी है।

#NayaJammuKashmir"

 

S.Tupe/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1984963) Visitor Counter : 726