पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारत आणि कोरिया प्रजासत्ताक यांच्यातील राजनैतिक संबंधांची पन्नास वर्षे केली साजरी
कोरिया प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षांना दिल्या हार्दिक शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2023 12:23PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरिया प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना भारत आणि कोरिया प्रजासत्ताक मधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी परस्पर आदरभाव, सामायिक मूल्य आणि वाढत्या भागीदारीचा आजवरचा प्रवास अधोरेखित करताना आपण यून सुक येओल यांच्या निकट सहवासात या दोन देशांमध्ये विशेष धोरणात्मक भागीदारी सखोल आणि विस्तारित करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले आहे की,
“आपण आज भारत आणि कोरिया प्रजासत्ताक मधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेची 50 वर्ष साजरी करत आहोत. परस्पर आदरभाव, सामायिक मूल्य आणि वाढत्या भागीदारीचा हा प्रवास राहिला आहे. आपण कोरिया प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना हार्दिक शुभेच्छा देत असून या दोन देशांमधील विशेष धोरणात्मक भागीदारी आणखी सखोल आणि विस्तारित करण्यासाठी त्यांच्या निकट सहवासात काम करण्यास उत्सुक आहोत.”
***
S.Tupe/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1984685)
आगंतुक पटल : 155
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam