पंतप्रधान कार्यालय
कॉप-28 मधील सदस्य देशांच्या एचओएस/एचओजीच्या उच्चस्तरीय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले विशेष भाषण
Posted On:
01 DEC 2023 5:47PM by PIB Mumbai
आपल्यापैकी प्रत्येक देश स्वतःसाठी जी हवामानविषयक उद्दिष्ट्ये निश्चित करत आहे, जी कटिबद्धता दर्शवत आहे ती पूर्ण करुनच दाखवली जातील असा निश्चय आपल्याला करावा लागेल.
आपल्याला एकत्रितपणे काम करावे लागेल.
आपण एकत्र येऊन काम करु, एकमेकाला सहकार्य करू, एकेमकांसोबत राहू असा निर्धार आपल्याला करावा लागेल.
आपल्याला जागतिक कार्बन तरतुदीमध्ये सर्व विकसनशील देशांना योग्य वाटा द्यावा लागेल.
आपल्याला अधिक समतोलपणे काम करावे लागेल.
हवामानविषयक बाबींमध्ये आपल्याला स्वीकार, उपशमन, हवामानविषयक बाबींसाठी वित्तपुरवठा, तंत्रज्ञान, तोटा तसेच हानी या सर्व घटकांमध्ये समतोल राखून पुढे जाण्याचा निर्धार आपल्याला करावा लागेल.
आपल्याला महत्त्वाकांक्षेसह काम करावे लागेल.
उर्जा हस्तांतरण योग्य, समावेशक आणि न्याय्य स्वरूपाचे असावे असा निश्चय आपल्याला करावा लागेल.
आपल्याला नवोन्मेषाचा स्वीकार करावा लागेल.
अभिनव तंत्रज्ञानांचा सातत्याने विकास करण्याचा निर्धार आपल्याला करावा लागेल.
स्वतःचा स्वार्थ न बघता आपल्याला दुसऱ्या देशांकडे तंत्रज्ञानाचे हस्तांतरण केले पाहिजे. स्वच्छ उर्जा पुरवठा साखळी सशक्त करायला हवी.
मित्रांनो,
संयुक्त राष्ट्रांच्या हवामान विषयक आराखड्याचे पालन करण्याप्रती भारत वचनबद्ध आहे.
म्हणून वर्ष 2028 मध्ये भारताला कॉप-33 शिखर परिषदेचे यजमानपद मिळावे असा प्रस्ताव आज मी या व्यासपीठावरून मांडतो.
येत्या 12 दिवसांमध्ये ग्लोबल स्टॉक-टेक च्या आढाव्यातून आपल्याला उज्ज्वल भविष्याचा मार्ग सापडेल अशी मला आशा वाटते.
तोटा तसेच हानीविषयक निधी कार्यान्वित करण्याचा जो निर्णय काल घेण्यात आला आहे त्यामुळे आम्हा सर्वांच्या अपेक्षा आणखीनच वाढल्या आहेत.
संयुक्त अरब अमिरातीच्या यजमानपदात कॉप-28 शिखर परिषद यशाची नवी शिखरे गाठेल असा विश्वास मला वाटतो.
मला हा विशेष सन्मान दिल्याबद्दल मी माझे बंधू शेख मोहम्मद बिन झायेद आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरसजी यांचे विशेष आभार मानतो.
तुम्हां सर्वांना खूप खूप धन्यवाद.
***
MI/SanjanaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1981864)
Visitor Counter : 79
Read this release in:
Kannada
,
Telugu
,
Gujarati
,
English
,
Malayalam
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil