पंतप्रधान कार्यालय
जम्मूमधील सीमावर्ती भागातील,समर्पित वृत्तीने आपले काम करणाऱ्या महिला सरपंचाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
“सर्व योजनांचे लाभ, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतील, आम्ही हे सुनिश्चित करू 'मोदी की गारेंटी' वाहन प्रत्येक गावात जाईल”
प्रविष्टि तिथि:
30 NOV 2023 1:25PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचाही शुभारंभ केला. सुरू केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी देवघर इथल्या एम्स रुग्णालयात 10,000 व्या जन औषधी केंद्राचे लोकार्पण केले. मोदींनी देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही सुरू केला. पंतप्रधानांनी या दोन्ही उपक्रमांची आज घोषणा केली, महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केलेल्या आश्वासनांची पूर्तता झाल्याची खूणगाठ दर्शविणारा हा कार्यक्रम आहे.
रंगपूर गावाच्या सरपंच बलवीर कौर आणि जम्मू जिल्ह्यातील अर्निया येथील एका शेतकरी महिलेने पंतप्रधानांना सांगितले की त्यांनी किसान क्रेडिट कार्ड योजना, फार्म मशीनरी बँक योजना आणि किसान सन्मान निधी योजना यासारख्या अनेक सरकारी योजनांचा लाभ घेतला आहे. तिचे गाव सीमेजवळ आहे, असेही तिने सांगितले. किसान क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केलेल्या ट्रॅक्टरची मालकीण झाल्याबद्दल मोदींनी तिचे अभिनंदन केले.
त्यांच्या प्रदेशाची माहिती त्यांना तोंडपाठ असल्याबद्दल पंतप्रधानांनी तिचे कौतुक केले.यावर सरपंचांनी उत्तर दिले, “मी तुमच्याकडूनच तळागाळात काम करायला शिकलेय आणि कामांचे तपशील मी कधी विसरत नाही”.
त्यांनी सरकारी योजना गावागावात 100 टक्के लाभार्थ्यांपर्यंत जागरुकता निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला आणि कौर यांना आसपासच्या दहा खेड्यांमध्ये पोहोचून प्रचार करण्याची सूचना केली. योजनांचे सर्व लाभ, शेवटच्या रांगेतल्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात हा विश्वास निर्माण झाल्याचे, पंतप्रधानांनी अधोरेखित केले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या उद्देशावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, विद्यमान लाभार्थ्यांच्या अनुभवातून शिकणे आणि ज्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही त्यांनाही यात समाविष्ट करणे हा या संकल्प यात्रेचा उद्देश आहे.
***
R.Aghor/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1981214)
आगंतुक पटल : 98
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam