पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

2047 पर्यंत विकसित भारत साकारण्याचा संदेश पोहोचला अरुणाचल प्रदेशातील गावागावात


अरुणाचल प्रदेशातील नामसाई  येथील लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद 

Posted On: 30 NOV 2023 1:26PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून  विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचाही त्यांनी प्रारंभ केला. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर येथे ऐतिहासिक 10,000  व्या जन औषधी केंद्राचे लोकार्पण केले.देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही मोदी यांनी यावेळी  सुरू केला.या वर्षाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान, महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या या दोन्ही उपक्रमांची घोषणा पंतप्रधानांनी  केली होती. या आश्‍वासनांची पूर्तता झाल्याची साक्ष आजचा  हा कार्यक्रम आहे..

अरुणाचल प्रदेशातील नामसाई येथील लाकर पालेंग यांनी पंतप्रधानांना त्यांनी सरकारच्या मदतीने बांधलेल्या पक्क्या घराची माहिती दिली.तसेच जल जीवन अभियानाने केलेल्या परिवर्तनाची माहिती दिली.

जेव्हा लाकर यांनी पंतप्रधानांना जय हिंदम्हणत त्यांचे स्वागत केले याला प्रतिसाद देत पंतप्रधान म्हणाले कीअरुणाचलमध्ये जय हिंद म्हणत स्वागत करणे  हे खूप लोकप्रिय  आहे आणि   अरुणाचलच्या लोकांशी संवाद साधणे नेहमीच आनंददायी असते, असे पंतप्रधान म्हणाले.

लाकर यांना त्यांच्या ग्रामपंचायतीने,विकसित भारत संकल्प यात्रेची माहिती दिली आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मूळ उद्देशाचा संदेश त्यांच्यासमोर स्पष्ट झाला. पंतप्रधानांनी ग्रामस्थांना 5 पथके तयार करून पाच गावांमध्ये जाऊन विकसित भारत संकल्प यात्रेचे  मोदी की गॅरंटीहे वाहन येत असल्याची माहिती देण्यास सांगितले.

***

R.Aghor/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1981091) Visitor Counter : 111