पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताला एक प्रमुख वैश्विक एमआयसीई स्थळ म्हणून विकसित करण्यासंदर्भात उद्योग क्षेत्रातील गोलमेज परिषदेचे पर्यटन मंत्रालयाकडून आयोजन


नवी दिल्ली येथे भारत मंडपम येथे 30 नोव्हेंबर 2023 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात एमआयसीई उद्योग क्षेत्रातील अग्रणी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होणार सहभागी

Posted On: 28 NOV 2023 11:33AM by PIB Mumbai

भारताला एक प्रमुख वैश्विक एमआयसीई ( बैठका, प्रोत्साहने, परिषदा आणि प्रदर्शने ) स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय नवी दिल्ली येथे भारत मंडपम येथे 30 नोव्हेंबर 2023 रोजी उद्योग क्षेत्रातील गोलमेज परिषद आयोजित करत आहे.

भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात, देशभरातील 56 शहरांमध्ये 200 हून अधिक बैठका आयोजित करण्यात आल्या.  यामुळे  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविषयी अभूतपूर्व रस निर्माण झाला आहे. जी 20 च्या आयोजनातून   भारताची मजबूत एमआयसीई  पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक व  नैसर्गिक वारसा जगासमोर आला आहे. त्याला अधिक चालना देण्यासाठी  आणि एमआयसीईमध्ये भारताला जागतिक अग्रणी म्हणून प्रस्थापित करण्यासाठी पर्यटन मंत्रालय  सक्रियपणे काम करत आहे.

 भारताला एक प्रमुख एमआयसीई  स्थान म्हणून चालना देण्यासाठी  पर्यटन मंत्रालय करत असलेल्या  प्रमुख उपक्रमांबद्दल गोलमेज परिषदेत,तपशीलवार माहिती देण्यात येईल.  या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी एमआयसीई  उद्योगासाठी राष्ट्रीय धोरण आणि आराखडा आहे.  मोठ्या परिषदा आणि प्रदर्शनांसाठी भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या दृष्टीकोनातून याची आखणी करण्यात आली  आहे.  एमआयसीई  उद्योगाच्या वाढीसाठी केंद्र, राज्य आणि शहर पातळीवर अनुकूल  परिस्थिती आणि संस्थात्मक आराखडा  तयार करणे हे राष्ट्रीय धोरणाचे ध्येय आहे. जागतिक स्तरावर एमआयसीई  व्यवसायात भारताचा वाटा लक्षणीयरीत्या वाढवणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.

या गोलमेज परिषदेत, एमआयसीई उद्योगातील वरिष्ठ अग्रणी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एकत्र आणून भारताला जागतिक एमआयसीई स्थळ म्हणून पुढे आणण्यासाठीच्या धोरणांवर चर्चा केली जाईल.

शहराला एमआयसीई स्थळ म्हणून चालना देण्यासाठी महत्त्वाच्या एमआयसीई स्थळी, शहरस्तरीय एमआयसीई प्रोत्साहन ब्यूरो उभारण्यासाठीचे प्रारूप मंत्रालयाने तयार केलेले आहे. शहरामध्ये कार्यक्रम आणि परिषदा आयोजित करण्यासाठी वन स्टॉप शॉप म्हणून कार्य करू शकणाऱ्या  आणि संबंधित स्थळी संपूर्ण एमआयसीई  परिसंस्था विकसित करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रासोबत काम करेल अशा   शहरस्तरीय एमआयसीई ब्यूरो प्रारूपासंदर्भात, मंत्रालय उद्योग अग्रणींकडून सूचना आणि प्रतिक्रिया मागवणार आहे.

पर्यटन मंत्रालयाने एमआयसीई स्थळ  म्हणून भारताला पुढे आणण्यासाठी  'मीट इन इंडिया' हा समर्पित ब्रँड सुरू केला आहे. राज्ये आणि उद्योग क्षेत्र यांच्यासोबत  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध मोहिमा राबवल्या जात आहेत. यासंदर्भात  अभिप्राय आणि सूचना जाणून घेणे आणि भारतातील एमआयसीई  क्षेत्राच्या विकासासाठी सामायिक दृष्टी आणि कृती योजना विकसित करणे हे या गोलमेज परिषदेचे  उद्दिष्ट आहे.

***

Jaydevi PS/Sonali K/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1980360) Visitor Counter : 127